शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्याची अंतिम मतदार यादी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2019 19:14 IST

निवडणूक आयोगाने यंदा जुलै महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली असता, त्यात नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच नाव नोंदणीची सोय करण्यात आली होती

ठळक मुद्देमतदान केंद्रांवर प्रसिद्धी : ५५ हजार मतदारांची वाढ

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघनिहाय अंतिम मतदार यादी जाहीर केली असून, शुक्रवारपासून जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर मतदारांना पाहण्यासाठी ही यादी उपलब्ध होणार आहे. सप्टेंबर महिन्यात जाहीर करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीनंतर नव्याने नोंदणी करण्यात आलेल्या मतदारांची संख्या पाहता, जिल्ह्यात नव्याने ५५ हजार मतदारांची नोंदणी करण्यात आली असून, या सर्वांना येत्या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावता येणार आहे.

निवडणूक आयोगाने यंदा जुलै महिन्यात मतदार पुनरीक्षण मोहीम राबविली असता, त्यात नवमतदारांची अधिकाधिक नोंदणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यासाठी दहावी उत्तीर्ण झाल्यानंतर बारावीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयातच नाव नोंदणीची सोय करण्यात आली होती. याशिवाय ज्यांची नावे मतदार यादीत नाहीत त्यांनाही नव्याने संधी देण्यात आली. साधारणत: तीन महिने राबविलेल्या या मोहिमेनंतर सप्टेंबरअखेर आयोगाने जिल्ह्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली. त्यात ४२,६०,३९२ मतदारांचा समावेश होता. त्यानंतरही आयोगाने पुन्हा मतदार नोंदणीची संधी उपलब्ध करून दिली. या काळात सुमारे दोन लाखांहून अधिक मतदारांचे अर्ज स्थानिक पातळीवर प्राप्त झाले. त्याची छाननी केली असता, दुबार, मयत व स्थलांतरित मतदारांची नावे वगळण्यात आल्यानंतर अंतिम मतदार यादीत ४३ लाख १५ हजार ५७८ मतदारांचा समावेश करण्यात आला. त्यात २२ लाख ६७ हजार ५४७ पुरुष, तर २० लाख ४७ हजार ९६० महिलांचा समावेश आहे. प्रारूप मतदार यादी व अंतिम मतदार यादीनुसार जिल्ह्यात ५५,१८६ मतदारांची वाढ झाली आहे. या मतदार यादीत ७१ तृतीयपंथीय मतदारांचाही समावेश आहे.गुरुवारी ही अंतिम मतदार यादी जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील, प्रांत कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आली असून, शुक्रवारपासून जिल्ह्यातील ४४४६ मतदान केंद्रांवर मतदारांसाठी ती पाहण्यासाठी उपलब्ध असेल.

टॅग्स :ElectionनिवडणूकNashikनाशिक