शहरं
Join us  
Trending Stories
1
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
2
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
3
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
4
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
5
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
6
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
7
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या
8
ENG vs IND : टीम इंडियाचा बचावात्मक पवित्रा? प्लेइंग इलेव्हनमध्ये या तिघांची एन्ट्री
9
पावसाचं थैमान, मृत्यूचे तांडव! रस्ते खचले, घरं पडली; 51 जणांचा मृत्यू, २२ अजूनही बेपत्ता
10
शाळेपासून होतं प्रेम, भेटण्यासाठी गेस्ट हाऊसमध्ये बोलावलं, शरीरसंबंध ठेवले आणि अखेर तिच्यावर सपासप वार केले  
11
Viral Video : ५ वर्षांची लेक समुद्रात पडली; वाचवण्यासाठी पित्याने थेट पाण्यात उडी घेतली! पुढे काय झाले बघाच... 
12
Share Market Update: शेअर बाजारात मोठी घसरण; Sensex ४०० अंकांपेक्षा अधिक आपटला, निफ्टीही घसरला
13
अनिल अंबानींच्या कंपनीचं लोन अकाऊंट ठरणार फ्रॉड; देशातील सर्वात मोठ्या बँकेची कारवाई
14
रेल्वे तिकीट बुकिंगवर परिणाम दिसू लागला! बराच वेळ झाला तरी तत्काळ तिकीटे उपलब्ध होती...
15
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुलीलामृत पारायण सप्ताह करा; स्वामींची कायम कृपा, कालातीत अखंड लाभ
16
लोकसभा, विधानसभा झाली आतातरी निवडणूक चिन्हावर सुनावणी घ्या...; उद्धव ठाकरेंना का हवाय धनुष्यबाण...
17
प्रेमासाठी बदललं जेंडर, पती निघाला फ्रॉड, पैसे-प्रॉपर्टीचा होता लालची, ट्रांसजेंडर अभिनेत्रीचा खुलासा
18
कळव्यातील महिलेच्या हत्येचं कोडं सुटलं, ४० हजार...; बिहारमधून दोघांना अटक, अल्पवयीन मुलाचाही समावेश
19
चमचमीत खायला आवडतं पण पावसाळ्यात थांबा; छोटासा निष्काळजीपणा अन् आजारांना आमंत्रण
20
आपल्या डोक्यात हवा गेली होती, म्हणूनच...; 'राशीचक्र'कार शरद उपाध्ये यांचं निलेश साबळेला खुलं पत्र

पात्र उमेदवारांची यादी घोषित

By admin | Updated: April 16, 2016 22:16 IST

येवला, नांदगाव : पोलीसपाटील, कोतवाल पदाची भरती

येवला : येवला व नांदगाव तालुक्यातील १३२ रिक्त पोलीस-पाटील व १८ कोतवालपदाच्या भरतीसाठीची अर्ज भरण्याची व छाननीची प्रक्रिया ६ एप्रिल रोजी संबंधित गावच्या ग्रामपंचायतीच्या फलकावर परीक्षेस पात्र व अपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी घोषित करण्यात आली आहे. या भरतीप्रक्रियेसाठी परीक्षेस पात्र ठरलेल्या ९६० उमेदवारांची परीक्षा रविवारी, दि. २४ एप्रिल रोजी येथील स्वामी मुक्तानंद विद्यालयात होणार असल्याची माहिती पोलीसपाटील व कोतवाल भरती समितीच्या अध्यक्ष तथा येवला उपविभागीय प्रांताधिकारी वासंती माळी यांनी एका पत्रकाद्वारे दिली आहे.येवला तालुक्यातील ७६ गावातील पोलीसपाटील पदासाठी ५५३ उमेदवार, ११ गावांच्या कोतवाल पदासाठी ४७ उमेदवार परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र ठरले आहेत. नांदगाव तालुक्यातील ५६ गावांतील पोलीसपाटील पदासाठी ३३८ उमेदवार, सात गावांच्या कोतवाल पदासाठी २२ उमेदवार परीक्षेस प्रविष्ठ होण्यास पात्र ठरले आहेत. नांदगाव तालुक्यातील मूळडोंगरी, (अनुसूचित जमाती), मंगळने व घाडगेवाडी, (अनुसूचित जमाती) या तीन गावांतून एकही उमेदवार पोलीसपाटील भरती परीक्षेसाठी पात्र ठरला नाही, तर मालेगाव करात येथे एका जागेसाठी कोतवाल भारतीसाठी एकही उमेदवार पात्र ठरला नाही.प्रवेशपत्राबाबत काही अडचणी उद्भवल्यास उपविभागीय अधिकारी कार्यालय येवला यांच्याशी थेट संपर्क साधण्याचे आवाहन वासंती माळी यांनी केले आहे. पोलीस-पाटील आणि कोतवाल भरतीप्रक्रि या प्रथमच पारदर्शी पद्धतीने पार पाडली जात आहे. परीक्षेची पूर्ण तयारी झाली आहे. (वार्ताहर)