शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांची रांग; पुन्हा हिरव्या सिग्नलसाठी थांब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2019 00:32 IST

नाशिक : शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक अधिकच बिकट बनू लागला आहे. महानगरातील अनेक चौकांमध्ये वाहनचालकांना आता किमान दोन सिग्नल ...

नाशिक : शहरातील वाहतुकीचा प्रश्न दिवसागणिक अधिकच बिकट बनू लागला आहे. महानगरातील अनेक चौकांमध्ये वाहनचालकांना आता किमान दोन सिग्नल थांबावे लागत आहे. वाहतुकीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी केलेल्या महापालिकेच्या ट्रॅफीक सेलचे अस्तित्वच नामशेष झाल्याचे चित्र असून, निदान आता तरी नाशिकच्या प्रशासकीय यंत्रणेने जागे होणे आवश्यक असल्याचा सूर त्रस्त वाहनधारक व्यक्त करु लागले आहेत.नाशिकमधील वाहतूक समस्या मार्गी लावण्यासाठी उपयुक्त ठरू शकणाऱ्या ट्रॅफीक सेलचे अस्तित्वच नामशेष झाल्यासारखे भासत आहे. त्यामुळे नाशकातील सर्व प्रमुख रस्त्यांवर सकाळी आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळी वाहनधारकांना किमान दुसºया सिग्नलपर्यंत वाट पहावी लागत असल्याने वाहनधारक त्रस्त बनू लागले आहेत. पार्किंगच्या जागांचा सुरू असलेला व्यावसायिक वापर, पार्किंगने व्यापलेले रस्ते, व्यापाऱ्यांनी गिळंकृत केलेले फुटपाथ आणि वाहतुकीच्या समस्येला कारणीभूत ठरणाºया सर्व संबंधित समस्यांवर महापालिकेचा कानाडोळा नाशिककरांना प्रचंड तापदायक ठरत आहे.महापालिकेच्या या चुका दूर करताना शहर वाहतूक विभागालाही नाकीनव आले आहेत. अर्थात पायाभूत सुविधांचाच अभाव असल्याने, कारवाईशिवाय अन्य काही होत नाही. शहरात वाहतुकीच्या दृष्टीनेही नियोजन करतानाच त्यासाठी सुविधा उभारण्याची सर्वस्वी जबाबदारी महापालिकेची असतानाही, त्याकडे डोळेझाक केली जाते आहे. वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी रस्त्यावरील अतिक्र मणे तातडीने दूर करण्याबाबत महापालिकेचीअतिक्र मण निर्मूलन यंत्रणा थिटी पडत असल्याचे वारंवार निदर्शनास येते. याबाबत कारवाई होणे आवश्यक आहे.समन्वयाचाअभावमहापालिका हद्दीतील रस्त्यांची सुरु असलेली कामे, त्यांचा कालावधी, पर्यायी रस्ते, तेथील नियोजन, पर्यायी रस्ते छोटे असल्याने त्यांच्यावरील वाढता ताण या सर्व बाबींमध्ये महापालिका, ट्रॅफीक सेल, स्मार्ट सिटी, वाहतूक विभाग यांच्यात समन्वयाचा प्रचंड अभाव असल्यानेच नागरिकांना सिग्नलवर दीर्घकाळ मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत काही पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसते.अतिक्रमणे काढल्यानंतर पुन्हा त्याच जागांवर, चौकांमध्ये, रस्त्यांवर विक्रेते काहीकाळानंतर परतत असल्याने वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ राहत आहे. मनपाने मागणी केल्यानंतर पोलीस कर्मचारी पुरविले जात असतानाही, मग अतिक्रमणे हटवून वाहतूक सुरळीत केली जात नाही. या सर्व प्रकरणात महापालिकेचेच मनोबल कमी पडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. अशोक स्तंभाच्या भागात काम सुरूअसताना पर्यायी रस्त्यांवरील पदपथ विक्रेते, पार्किंग यांचे नियंत्रण आवश्यकता आहे.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीस