शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

राजकीय व्यंगचित्र काढण्यावर आल्या मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 00:14 IST

व्यंगचित्रकारांना राजकीय चित्र काढणे जिकिरीचे झाले आहे. पूर्वी अशी स्थिती नव्हती पण आता मर्यादा आल्या आहेत, असे स्पष्ट मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी शनिवारी (दि. २८) ‘हास्यदीपावली’ या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

नाशिक : व्यंगचित्रकारांना राजकीय चित्र काढणे जिकिरीचे झाले आहे. पूर्वी अशी स्थिती नव्हती पण आता मर्यादा आल्या आहेत, असे स्पष्ट मत ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांनी शनिवारी (दि. २८) ‘हास्यदीपावली’ या व्यंगचित्राच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.  गंगापूररोड येथील कुसुमाग्रज स्मारकातील छंदोमयी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या व्यंगचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रभाकर झळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना झळके यांनी, चित्रकार आणि साहित्यिकांनी झिडकारलेल्या व्यक्ती व्यंंगचित्रकार होतात, असे स्पष्टपणे नमूद करताना साहित्य संमेलने भरविली जातात परंतु व्यंगचित्र प्रदर्शने भरवली जात नसल्याबाबत खंत व्यक्त केली. अशा प्रकारची प्रदर्शने भरवणे ही काळाची गरज असून पुणे, नागपूर, मुंबई, नांदेड याठिकाणी या प्रकारची प्रदर्शने भरवून कला जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे सांगितले.  कार्टुनिस्ट कम्बाइन या संस्थेतर्फे आयोजित या चित्रप्रदर्शनात राज्यातील ५० व्यंगचित्रकारांची विविध विषयांवरील १५० हून अधिक व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. यामध्ये चारुहास पंडित, विवेक मेहेत्रे, घनश्याम देशमुख, संजय मिस्त्री, रवींद्र बाळापुरे, अरविंद राजपूत, राजेंद्र सरग यांच्यासह ज्ञानेश सोनार, महेंद्र भावसार, विश्वास सूर्यवंशी, दिनेश धनगव्हाळ, रवि भागवत, भटू बागले, राधा गावडे, शरयू फरकांडे आदी व्यंगचित्रकारांच्या चित्रांचा यामध्ये समावेश आहे. या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी कोंडाजीमामा आव्हाड, तानाजी जायभावे आणि विश्वास ठाकूर हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते.  सोमवार (दि. ३०)पर्यंत सकाळी १०.३० ते रात्री ८.३० या वेळेत हे चित्रप्रदर्शन सर्वांसाठी खुले असून, अधिकाधिक विद्यार्थी, चित्रप्रेमींनी या चित्रप्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.हास्यदीपावली या व्यंगचित्र प्रदर्शनात आपल्या सभोवताली घडणाºया विविध घटनांवर आधारित व्यंगचित्रे मांडण्यात आली आहेत. यामध्ये स्त्री भ्रूणहत्या, मुंबई येथे झालेली रेल्वेस्थानक दुर्घटना, आंतरराष्ट्रीय पातळीवरील राजकारण, भ्रष्टाचार, कौटुंबिक घडामोडी आदी विषयांवरील मार्मिक व्यंगचित्रे रेखाटण्यात आली असून, क्रि केटर, सिनेअभिनेते, अभिनेत्री राजकारणी व्यक्ती यांची व्यंगचित्रे सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहेत.