शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मनमाड शहरात विजेचा लपंडाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2019 00:55 IST

मनमाड : शहरात गेल्या दीड महिन्यांपासून विजेचा सुरू असलेला लपंडाव व ऐन सणाच्या दिवशी यात्रोेत्सव काळात खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या मनमाडकर नागरिकांनी वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.

ठळक मुद्दे अभियंत्यास पुष्पगुच्छ : संतप्त नागरिकांचे गांधीगिरी पद्धतीने आंदोलन

ंमनमाड वीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस.बी. शिंदे यांचा गांधीगिरी मार्गाने सत्कार करताना वीजग्राहक संघर्ष समितीचे संतोष बळीद, नितीन पांडे, नारायण पवार, कैलास पाटील, राजेंद्र ताथेड, जयकुमार फुलवाणी, संजोग बरडिया आदी. 

मनमाड : शहरात गेल्या दीड महिन्यांपासून विजेचा सुरू असलेला लपंडाव व ऐन सणाच्या दिवशी यात्रोेत्सव काळात खंडित झालेल्या वीजपुरवठ्यामुळे संतप्त झालेल्या मनमाडकर नागरिकांनी वीज वितरणच्या उपकार्यकारी अभियंत्यांना पुष्पगुच्छ देऊन गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केले.नुकत्याच झालेल्या महाशिवरात्री सणाच्या दिवशी दत्तमंदिर परिसरात असणाऱ्या संगमेश्वर व पाताळेश्वर महादेव मंदिराच्या परिसरात भरणाऱ्या सार्वजनिक यात्रोत्सवात दुपारी ३ वाजेपासून ते रात्री साडेअकरा वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे यात्रोत्सव काळात दर्शनासाठी आलेल्या भाविकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. विशेषत: महिलावर्ग, वयोवृद्ध व लहान मुले यांना या अंधारात यात्रेचा आनंद घेता आला नाही.महावितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या बेजबाबदार कारभाराबद्दल नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. संतप्त नागरिकांनीवीज वितरणचे उपकार्यकारी अभियंता एस. बी. शिंदे यांना गांधीगिरी पद्धतीने फुलांचा गुच्छ देऊन आंदोलन केले.यावेळी वीजग्राहक संघर्ष समितीचे अध्यक्ष संतोष बळीद, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, जिल्हा चिटणीस नारायण पवार, शहराध्यक्ष जयकुमार फुलवाणी, राष्ट्रवादी कॉँग्रेसचे गटनेते नगरसेवक कैलास पाटील, राजेंद्र ताथेड, संजोग बरडिया, आशिष घुगे, बाळासाहेब सुपेकर, साजीद शेख, नितीन परदेशी, दादाभाई परदेशी, विक्की सुरवसे आदी पदाधिकारी उपस्थित होते.दरम्यान, उपकार्यकारी अभियंता एस.बी. शिंदे व इतर अधिकारी मनमाड शहरात उत्सव काळात हजर राहत नसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला.