शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्हा बँक संचालकांच्या बरखास्तीवरील स्थगिती उठविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 01:52 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यास उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी दिलेली स्थगिती शुक्रवारी उठविली. आर्थिक अनियमिततेच्या कारणातून रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार खात्याने सदर बरखास्तीची कारवाई केली होती.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाचा निकाल : विद्यमान सहा आमदारांसह संचालकांना धक्का 

नाशिक : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक मंडळ बरखास्त करण्यास उच्च न्यायालयाने तीन वर्षांपूर्वी दिलेली स्थगिती शुक्रवारी उठविली. आर्थिक अनियमिततेच्या कारणातून रिझर्व्ह बँकेच्या सूचनेनुसार सहकार खात्याने सदर बरखास्तीची कारवाई केली होती.बँकेची निवडणूक तोंडावर आलेली असताना हा निकाल लागला आहे. रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळ बरखास्त करण्याची यापूर्वीच कारवाई केली असल्याने संचालक मंडळातील विद्यमान सहा आमदार, माजी खासदार व माजी राज्यमंत्र्यासह २१ संचालकांना कोणत्याही बॅंकेची आगामी निवडणूक लढविता येणार नसल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.जिल्हा मध्यवर्ती बँकेची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट झाली असून, तत्कालीन युती सरकारच्या शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे थकबाकीदारांनी बँकेकडे पाठ फिरविली. परिणामी आर्थिक अनियमितता व अनुत्पादक मालमत्तेत (एनपीए) वाढ झाल्याची बाब नाबार्डच्या तपासणीत आढळून आली होती. याबाबत त्यांनी रिझर्व्ह बँकेला आपला सविस्तर अहवाल सादर केला होता. या अहवालाच्या आधारे तीन वर्षांपूर्वी रिझर्व्ह बँकेने नाशिक जिल्हा बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नेमणूक केली होती.रिझर्व्ह बँकेच्या या कारवाईविरुद्ध संचालक मंडळाने उच्च न्यायालयात धाव घेतली व स्थगिती मिळविली होती. गेली तीन वर्षे उच्च न्यायालयात त्याची सुनावणी सुरू होती. याचदरम्यान, तत्कालीन युती सरकारच्या काळात पुन्हा संचालक मंडळाकडे कारभार सोपविला जाऊन भाजपचे केदा आहेर अध्यक्ष झाले होते. उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीवर २७ फेब्रुवारी २०२१ रोजी अंतिम सुनावणी घेण्यात येऊन त्यात न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत एक महिन्याच्या आत निकाल देण्याचे जाहीर केले होते. बरखास्तीनंतर अपात्र ठरलेले संचालकबरखास्तीला सामारे जावे लागलेल्या संचालक मंडळामध्ये विद्यमान आमदार माणिकराव कोकाटे, नरेंद्र दराडे, किशोर दराडे, सुहास कांदे, दिलीप बनकर, सीमा हिरे, विद्यमान अध्यक्ष केदा आहेर,  माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, माजी राज्यमंत्री शोभा बच्छाव, माजी आमदार शिरीष कोतवाल, अनिल कदम, जे. पी. गावीत तसेच गणपतराव पाटील, शिवाजी चुंभळे, परवेझ कोकणी, संदीप गुळवे, नामदेव हलकंदर असा सर्वपक्षीयांचा समावेश आहे.प्रशासकाकडे सोपवावा लागणार कारभारशुक्रवारी (दि.१९) न्यायालयाने निकाल जाहीर करताना त्यात रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार घेतला गेलेला संचालक मंडळ बरखास्तीचा निर्णय वैध ठरवून स्थगिती उठविली. त्यामुळे आता संचालक मंडळ बरखास्त झाले असून, उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध सर्वाेच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी पंधरा दिवसांची मुदत संचालक मंडळाला देण्यात आली आहे. तत्पूर्वी त्यांना प्रशासकाकडे कारभार सोपवावा लागणार आहे.निवडणुकीचे भवितव्य धोक्यातजिल्हा बँकेचे संचालक मंडळ सहकार कायदा ११० (अ) अन्वये बरखास्त करण्यात आल्याने कायद्यानुसार त्यांना सहा वर्षे निवडणूक लढविण्यास बंदी आहे. जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक मंडळ एप्रिल २०१५ मध्ये अस्तित्वात आले होते. त्यांची मुदत एप्रिल २०२० मध्येच संपुष्टात आली. तथापि, कोरोनामुळे सहकार क्षेत्राच्या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्याने संचालक मंडळाला एक वर्षे मुदतवाढ मिळाली. येत्या मे महिन्यात संचालक मंडळाची निवडणूक होण्याची शक्यता आहे; परंतु विद्यमान संचालक मंडळातील एकाही संचालकाला ही निवडणूक लढविता येणार नाही.

टॅग्स :NashikनाशिकbankबँकHigh Courtउच्च न्यायालय