शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

तडजोडीतच जीवनाच्या सुखाचा मार्ग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 01:01 IST

आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या वर्षांत संसार सुरळीत सुरू असल्याच्या भावना दिव्यांग जोडीदारांनी व्यक्त केल्या.

नाशिक : आयुष्यात प्रत्येकाला जडजोडी कराव्याच लागतात. परंतु दिव्यांगाला जाणीवपूर्वक अशा तडजोडी स्वीकारून आयुष्याची वाटचाल करावी लागते. स्वीकारलेल्या जोडीदाराच्या सर्व मर्यादा मान्य करून त्यांच्याबरोबरच संसार करावा लागतो. अशा तडजोडी स्वीकारल्यामुळेच आज इतक्या वर्षांत संसार सुरळीत सुरू असल्याच्या भावना दिव्यांग जोडीदारांनी व्यक्त केल्या.  जनलक्ष्मी बॅँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात तुळसाआई बहुद्देशीय संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्ताने पाच दिव्यांग जोडप्यांचा सत्कार करण्यात आला. यावळी या दिव्यांगांनी आपल्या भावना प्रकट केल्या. तडजोडी स्वीकारल्यास दिव्यांना जीवन जगणे सुलभ होते. दोघांनी एकमेकांना समजून घेणे महत्त्वाचे असून, सर्वात महत्त्वाचे म्हणजे साथ दिली पाहिजे, अशा भावना अंध दिव्यांग बांधवांनी व्यक्त केल्या. यावेळी एनजीओ फोरमचे अध्यक्ष मुक्तेश्वर मुनशेट्टीवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. दिव्यांग व्यक्तींचे जीवन जगणे आणि त्यांना जगविणे फार कठीण काम असते. दिव्यांगांचे विवाह जुळविताना तर अनेक अडचणी येतात. त्यावर मात करीत हा प्रश्न तडीस न्यावा लागतो. सामाजिक भावनेचा प्रश्न अशा संस्थांसमोर नेहमी असतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी डॉ. सिंधू काकडे यांनीही मार्गदर्शन केले. दिव्यांगांच्या प्रश्नांवर प्रसंगी लढा उभारण्याची वेळ आल्यानंतर सर्वांनी त्यासाठी पुढे आले पाहिजे, असेही मुनशेट्टीवार यांनी सांगितले. यावेळी संगीता बुथकर, किशोर काळे, कैलास गोडसे, डॉ. संगीता पवार, किरण तुपलोंढे, शशांक हिरे उपस्थित होते. याप्रसंगी साळुंखे, बैसाने, काशीनाथ पाडवी, नितीन निर्मळ, रेखा साळुंके, घनदाट यांचा सत्कार करण्यात आला. संस्थेच्या अध्यक्षा शोभा काळे यांनी प्रास्ताविक केले तर संगीता पवार यांनी आभार मानले.यावेळी सूर्यभान साळुंके, नितीन घनदाट, शारदा व शैलेश बैसाने, कैलास निर्मळ यांनी अनुभव कथन केले. दिव्यांगांच्या बाबतीतील काही महत्त्वाच्या बाबी आणि सत्य स्वीकारणे अपेक्षित असते. आपल्या मर्यादा ओळखून आपल्या इच्छांना आळा घालता आले पाहिजे. आपल्या आयुष्यात येणाऱ्या अडचणीच्या क्षणांचा समरस होऊन सामना केला, तर जोडीदार कोणीही असो जीवन सुखी झाल्याशिवाय राहत नाही, अशादेखील भावना दिव्यांग व्यक्तींनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Nashikनाशिक