शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून जीवघेणी वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 16:57 IST

दिंडोरी तालुका : पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष

ठळक मुद्देखासगी वाहनांतून प्रवाशांची वाहतूक करताना वाहतुकीच्या नियमांचा भंग

पांडाणे : दिंडोरी तालुक्यात वाहतूक नियमांची पायमल्ली होत असून, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरून जीवघेणी वाहतूक केली जात आहे. पोलीस यंत्रणेचे मात्र याकडे पूर्णत: दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.पिंपळगाव-वणी ते सापुतारा ह्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम सुरू असल्यामुळे रस्त्याने पायी चालणेसुद्धा कसरतीचे बनले आहे. अशा स्थितीत खासगी वाहनांतून प्रवाशांची वाहतूक करताना वाहतुकीच्या नियमांचा भंग केला जात आहे. वणी परिसरातील पिंपळगाव, पोरगाव, मुळाणे, बोरगाव, दहिवी, सुरगाणा, भनवड अशा भागात परिवहन मंडळाची बससेवा कमी असल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो; परंतु खासगी वाहनचालकांकडून क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो. याशिवाय, चालक ांकडून मोबाइलवर बोलत वाहन चालविले जात असल्याने अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता असते. मागील महिन्यात मेशी फाट्यावर बस-रिक्षा अपघातात २६ प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. त्यानंतर मालेगाव व देवळा तालुक्यात अवैधरीत्या प्रवासी वाहतुकीवर वाहतूक विभागाने कार्यवाही केली होती. तशीच कारवाई दिंडोरी तालुक्यातही करावी तसेच परिसरात परिवहन महामंडळाने मिनी बसेस चालवाव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. 

टॅग्स :NashikनाशिकTrafficवाहतूक कोंडी