शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर  जीवघेणी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 00:37 IST

मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.

आडगाव : मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुलींंवर वाहनधारकांसह पादचाऱ्यांची जीवघेणी कसरत सुरू आहे. या महामार्गावर अनेकांचा बळी गेला आहे, तर काही लोकांना कायमस्वरूपी अपंगत्व आले आहे. के. के. वाघ ते जत्रा हॉटेल उड्डाणपुलाचे भूमिपूजन होऊन जवळपास दीड वर्ष उलटूनही काम सुरू झालेले नाही. प्रत्यक्ष कामाला सुरुवात कधी होणार, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील अमृतधाम, रासबिहारी, जत्रा चौफुली याठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या नित्याची झाली असून, रोज लहान-मोठे अपघात घडतात. या उड्डाणपुलासाठी चौफुलीवर अनेक संघटनांनी, स्थानिक नागरिकांनी आंदोलने करून पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने उड्डाणपूल मंजूर केला. महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर दीड वर्षापूर्वी मोठ्या दिमाखात भूमिपूजन करण्यात आले पण अजूनही उड्डाणपुलाच्या कामाला मुहूर्त मिळालेला दिसत नाही. त्यामुळे प्रशासन अजून किती बळी घेण्याची वाट बघत आहे, असा संतप्त सवाल नागरिकांनी विचारला आहे. या मार्गावर चारही बाजूने प्रचंड वेगाने वाहतूक सुरू असते. बघताक्षणी वाहने अंगावर येतात. त्यामुळे रस्ता क्र ॉस करताना लहान मुले, वयोवृद्ध नागरिक व महिलांची तारांबळ उडते. या गोंधळात बºयाचदा अपघात घडतात. शिवाय या परिसरात शाळा, कॉलेजेस यांची संख्यादेखील मोठी आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा नेहमी राबता असतो. वाहतूक पोलीसदेखील कायमस्वरूपी दिसत नाही. अशी तक्रार नागरिक करत आहे. सन २०१३ पासून आजपर्यंत ४०५ अपघात आडगाव पोलीस स्टेशन हद्दीत दाखल झालेले आहेत. त्यामध्ये १६३ लोकांचा मृत्यू झाला असून २९४ लोक जखमी झाले आहेत. यातील ८० टक्के अपघात मुंबई-आग्रा महामार्गावरील चौफुल्यांवर झालेले आहेत.मुंबई-आग्रा रोडवरील चौफुलींवर वाहतूक कोंडी व अपघात ही समस्या गंभीर झाली असून, उड्डाणपूल होणे गरजेचे आहे. पण दीड वर्ष उलटूनही कामाला मुहूर्त मिळत नाही. या समस्या सोडविण्यासाठी तत्काळ उड्डाणपुलाचे काम सुरू करावे.- संदीप जाधव, नागरिक

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad safetyरस्ते सुरक्षा