शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

राजापूर परिसरातील पिकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 00:00 IST

राजापूर : परिसरात शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला ...

ठळक मुद्देशेतकऱ्यांत समाधान : दुबार पेरणीचे संकट टळले

राजापूर : परिसरात शुक्रवारी (दि.९) संध्याकाळी पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. खरिपाच्या पेरणीनंतर पावसाचा खंड पडला होता. पिके पाण्यावाचून सुकू लागली असताना वरुणराजाने हजेरी लावल्याने पिके पुन्हा तरारली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे.राजापूर व परिसरात उत्तर पूर्व भागात शेतकऱ्यांनी जमिनीत पुरेशी पेरओल असेल तरच पेरणी करावी अन्यथा पेरणी करू नये असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले होते. परंतु शेतकऱ्यांनी सुरुवातीला झालेल्या पावसावर पेरण्या उरकल्या होत्या. त्यानंतर पावसाने ओढ दिल्याने शेतकरी चिंतित होता. पेरणी केली पण काही ठिकाणी कोंभ वर आलेच नव्हते. खरिपात शेतकऱ्यांनी मका, भुईमूग, बाजरी, तूर अशी पिके घेतली आहेत. राजापूर व परिसरात दोन टप्प्यांत पेरण्या झाल्या आहेत. आता काही ठिकाणी मका मोठा झाला आहे तर काही मक्याला आताच कोंब फुटत आहे. आजही विहिरींना पाणी नसल्याने शेतकरी वर्ग लाल कांदा उळे टाकण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. पावसाचा खंड पडल्याने पिकांची वाढ काही प्रमाणात खुंटली आहे. त्यात आता लष्करी अळीचा प्रादुर्भाव वाढल्याने पुन्हा औषधे फवारणी केली जात आहे.राजापूर येथे बऱ्याच पेरण्यांमध्ये तीन आठवड्यांचा फरक आहे. अगोदरच्या पिकांची दोनदा कोळपणी झाली आहे. तर नंतर पेरणी केलेली पिके हे आता उतरत आहेत. काही शेतकऱ्यांनी काळपट जमीन असलेल्या शेतात सोयाबीन पेरणी केली, परंतु पुरेशी पेरओलअभावी दुबार पेरणी करावी लागली आहे. अगोदर पेरणी केलेल्या पिकांना आता पाऊस झाल्याने युरिया खताची मात्रा देणे सुरू असून बऱ्याच शेतकऱ्यांना युरिया खत मिळत नसल्याने त्यांची धावपळ सुरू झाली आहे. पावसाळ्यात दरवर्षी युरिया खताची टंचाई निर्माण होते की केली जाते याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.विहिरींनी अजूनही तळ गाठलेला आहे. आता थोडाफार प्रमाणात पाऊस झाल्याने पिकांना या नक्षत्राने जीवदान दिले आहे. येथून मागे दोन दिवसांपूर्वी पिकांची परिस्थिती बिकट झाली होती. सध्या महागाई भरमसाठ वाढली असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. शासनाने कर्जमाफी केली असली तरी बरेच शेतकरी वंचित राहिले आहेत; परंतु यात जे शेतकरी थकीत राहतात त्यांना कर्जमाफी दिली जाते. व जे शेतकरी थकीत न राहता कर्ज वेळेवर भरतात त्यांना कर्जमाफी नाही ही शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. दोन लाखांपर्यंत सरसकट कर्ज माफ केले असते तर उर्वरित दोन लाखांवरील शेतकऱ्यांनी भरून दिले असते, अशी चर्चा सध्या होताना दिसत आहे.शेतकरी वर्ग हा नेहमी आशावादी राहून शेतीकामात व्यस्त असतो. शेतकऱ्यांना वेळेवर खते मिळत नाही. वेळेवर पाऊस नाही अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या जीवनात येतात. तरीही शेतकरी न डगमगता संकटांना सामोरे जातो. शेतकऱ्यांवर पेरणीपासून ते पीक येईपर्यंत अनेक संकटे येतात. शासनाने शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष केंद्रित करावे.- साखरचंद घुगे, शेतकरी, राजापूर 

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती