शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘गुरुगौरव’ मैफलीतून उलगडला जीवनप्रवास

By admin | Updated: September 14, 2016 00:31 IST

इंदिरानगर : राजाभाऊ देव जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रम रंगला

 नाशिक : अमीर रागातील ‘चमेली फुली चंपा’, किराणा घराणे राग दरबारी कानडातील ‘और नही कछू काम’ ही पारंपरिक बंदिश तसेच पंडित राजाभाऊ देव यांची खासियत असलेला ‘पलटा भीम पलाशी’ या आणि अशा विविध रागांचे सादरीकरण डॉ. अलका देव-मारूलकर यांनी ‘गुरुगौरव’ या कार्यक्रमात केले.इंदिरानगर येथील संत ज्ञानेश्वर संकुलातील स्वर्णिमा सभागृहात पंडित राजाभाऊ देव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात ज्येष्ठ गायक राजाभाऊ देव यांचा जीवनपट गायन तसेच वेगवेगळ्या आठवणींतून उलगडून दाखविण्यात आला. यावेळी डॉ. अलका देव-मारूलकर यांनी देव यांचा ग्वाल्हेर, जयपूर तसेच किराणा गायकीच्या अभ्यासावर प्रकाशझोत टाकला, तसेच पिता आणि गुरुस्थानी असलेल्या नात्याच्या विविध आठवणींना उजाळा दिला. देव यांच्या जीवनात आलेले सुखद आणि कष्टदायक अनुभवही यावेळी मांडण्यात आले. पंडित राजाभाऊ देव यांची संगीतावर असलेली निष्ठा आणि ध्यास तसेच गुरुंबद्दलची असणारी श्रद्धा याबाबतच्या आठवणींना उजाळा देताना विविध प्रसंग सांगितले. ग्वाल्हेरला घेतलेले संगीत शिक्षण, संगीता क्षेत्रात येण्यासाठी वडिलांचा असलेला विरोध अशा विविध घटनांचा उल्लेख डॉ. अलका देव-मारूलकर यांनी यावेळी केला.कार्यक्रमात या नंतर निनादिनी संस्थेच्या शिष्यांनी राग शुद्ध कल्याणमधील ‘सुन सखीरे बाजे’, मारू बिहाग रागातील ‘मुख निरख सावरियाँ’, राग देव गंधारमधील ‘मन मितवा मोरा’ ही बंदिश, नायकी कानडा रागातील ‘एरी मे को पिया बीन’, पुरिया कल्याण रागातील ‘मोरा मनवा लाजत है’,तसेच भूप रागातील ‘मानस सुध बाळी’ कोमल रिषभ रागातील ना मोहे अवरित, राग अभुगी कानडातील ‘जगत्पत सब सुख निधान’या रागांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. यावेळी डॉ. अलका देव-मारूलकर आणि शिवानी मारूलकर-दसककर यांना निनादिनी संस्थेतील शिष्यांनी संगीत साथ दिली. यात शिवानी मारूलकर-दसककर, स्वराली पणशीकर, मुक्ता जाधव, अश्विनी भार्गवे, जयश्री राजेगावकर, प्राजक्ता पितळे, अमृता जाधव, रजिंदर कौर, गौरी दसककर, कल्याणी दसककर, ईश्वरी दसककर, प्रीतम नाकील, श्रीराम तत्त्ववादी यांचा समावेश होता. दरम्यान पंडित राजाभाऊ देव यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे पहिले पुष्प गुंफताना वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. (प्रतिनिधी)