लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : उपनगर परिसरातील महाराष्ट्र हायस्कूलजवळ दीड वर्षापूर्वी जुन्या भांडणाची कुरापत काढून योगेश पवार या युवकाचा खून, त्याचे मित्र किरण सुरवाडे यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न तर सूरज पगारे यास लाथाबुक्क्यांनी मारहाण करणाऱ्या पाचही आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश आऱ आऱ वैष्णव यांनी शनिवारी (दि़६) जन्मठेप व प्रत्येकी पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली़ या निकालानंतर आरोपींच्या नातेवाइकांनी न्यायालयात गोंधळ घातल्याने सरकारवाडा पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता़ सरकारी वकील योगेश कापसे यांनी या खटल्यात काम पाहिले़ विजय ओहोळ यांच्या गणपती मंडळासमोर २४ सप्टेंबर २०१५ रोजी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती़ किरण चंद्रकांत सुरवाडे (२२,उपनगर), योगेश शुद्धोधन पवार ( २३, उपनगर) व सूरज विजय पगारे (२९,रा़उपनगर भाजी मार्केट जवळ, नाशिकरोड) हे तिघे मित्र उपनगर परिसरातील गणपती पाहून घरी जात होते़ त्यावेळी मागील भांडणाची कुरापत काढून आरोपी अक्षय दीपक चावरिया (२१, उपनगर, नाशिक), सनी राजेश लोट (२४,महालक्ष्मी चाळ, वडाळा नाका, भद्रकाली), अभिजित ऊर्फ रिंकू सुनसुना (१८, मनपा क्वार्टर, उपनगर), मुकेश दिलीप मोहिते (२२, रा़ मंगलमूर्तीनगर, कॅनॉल रोड), दीपक रामचंद्र चावरिया (४१ उपनगर) यांनी योगेश पवार या युवकाचा चाकूने भोसकून खून केला़ किरण सुरवाडे यांच्यावर चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न तर सूरज पगारे यास लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण केली़ यानंतर जमलेल्या जमावाला चाकू दाखवून दहशत निर्माण करून आरोपी फरार झाले होते.
उपनगरच्या पवार खुनातील पाच आरोपींना जन्मठेप
By admin | Updated: May 7, 2017 00:37 IST