शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील पाच रेशन दुकानांचे परवाने रद्द, चार निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 19:28 IST

रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे उलंघन होत असल्याने अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पाच दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून, चार दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ठळक मुद्देनाशिक जिल्ह्यातील रेशन दुकानांवर कारवाईपुरवठा विभागाकडून पाच दुकानांचे परवाने रद्दचार दुकानांवर निलंबनाची कारवाई

नाशिक : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनच्या काळात एकही नागरिक उपाशी राहू नये यासाठी अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने या काळात नागरिकांना अन्नधान्य वाटपाची जबाबदारी स्वस्त धान्य दुकानदारांवर सोपविली आहे. परंतु, रेशन धान्य वाटप करताना अनियमितता तसेच नियमांचे उलंघन होत असल्याने अशाप्रकारे गैरप्रकार करणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील पाच दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले असून, चार दुकानांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.राज्यातील धान्य वितरण व्यवस्थेवर अन्न, नागरी पुरवठा विभागाचे कटाक्षाने लक्ष असून, धान्य वितरण प्रणालीत अनियमितता अथवा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वितरकांवर नियंत्रणासाठी अन्न, नागरी पुरवठा विभागाने विशेष पथक निर्माण के ले आहे. या पथकाच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्यात करण्यात आलेल्या कारवाईत नाशिक तालुक्यातील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ९६ येथे निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे धान्य वितरण अधिकारी यांच्या कक्षेतील दुकान क्रमांक १६७, येवला तालुक्यातील दुकान क्रमांक १३२ व दिंडोरी तालुक्यातील दुकान क्रमांक ११५ या ठिकाणी विशेष पथकाने कारवाई करून संबंधित दुकानांचे निलंबन केले असून, नाशिक तहसील यांच्या कक्षेतील स्वस्त धान्य दुकान क्रमांक ५ सह धान्य वितरण अधिकारी नाशिक यांच्या कक्षेतील दुकान क्रमांक ५, १६२, १२४ व ५६ या दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहे. यातील नाशिक तहसील यांच्या कक्षेतील एकलहरे यथेली स्वस्त धान्य दुकानदारांवर गुन्हाही दाखल करण्यात आला आहे. या धडक मोहिमेदरम्यान, जिल्ह्यातील एकूण नऊ दुकानांवर कारवाई करण्यात आली असून,  त्यांच्याकडून सुमारे १९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांनी दिली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याNashikनाशिकfoodअन्न