शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

‘लेव्ही’ने शेतकऱ्यांची ‘टोटल लेव्हल’

By admin | Updated: June 17, 2014 00:09 IST

‘लेव्ही’ने शेतकऱ्यांची ‘टोटल लेव्हल’

 

पिंपळगाव / लासलगाव : ‘लेव्ही’च्या प्रश्नावरून कधी माथाडी कामगारांकडून तर कधी व्यापाऱ्यांकडून पुकारण्यात आलेल्या बंदमुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांचा कारभार दोन वर्षांत तब्बल नऊ वेळा ठप्प झाला आहे. लिलाव प्रक्रिया बंद झाल्यामुळे या कालावधीत शेतकऱ्यांचे कोट्यवधीचे नुकसान झाले असून ‘लेव्ही’मुळे बळीराजाची ‘टोटल लेव्हल’ झाल्याचे म्हणजेच तो अक्षरश: भुईसपाट झाल्याचे चित्र आहे.२००८ पर्यंत लेव्हीची कपात शेतकऱ्यांनी आणलेल्या मालाच्या पैशातून केली जात असे. सदर पद्धतीस नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी विरोध करीत मुंबई उच्च न्यायलयात दाद मागितली. त्यावर न्यायलयाने लेव्हीची कपात शेतकऱ्यांच्या पैशातून न करता ती व्यापाऱ्यांनी द्यावी, असा निकाल दिला. त्यानुसार माथाडी कामगारांनी व्यापारीवर्गाकडे लेव्हीची मागणी केली. मात्र त्यास व्यापाऱ्यांनी नकार दिला.२००८ पासून आजवर ‘लेव्ही’चे सुमारे २३ कोटी रुपये थकलेले असल्याचा माथाडी कामगारांचा दावा आहे. दरम्यान, २००८ पासून आजवर लेव्हीच्या दरात दोनवेळ वाढ करण्यात आली. तसे आदेशही जिल्हा निबंधकांनी बजावले. २००८ साली २२ टक्के लेव्ही कपात करण्यात येत असे. त्यानंतर सदर कपात ३४ टक्क्यांवर गेली. सध्या ४४ टक्के लेव्हीचा दर आहे. अर्थात सदर दरवाढ व्यापारी वर्गांस मान्य नाही. जे कामगार व्यापाऱ्यांकडे काम करतात त्यांच्या लेव्हीची रक्कम व्यापाऱ्यांकडून भरली जाते. माथाडी कामगारांची नेमणूक बाजार समिती करीत असल्यामुळे त्यांच्या लेव्हीची रक्कम व्यापारी भरीत नाहीत, असे व्यापारी असोसिएशनचे म्हणणे आहे.