पेठ : सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ पेठ तालुक्यातील शेकडो नागरिकांनी पंतप्रधान कार्यालयास पत्र पाठविले. खासदार भारती पवार यांच्या उपस्थितीत पेठ येथे झालेल्या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. केंद्र शासनाने नागरिकत्व विधेयक जारी करण्याचा ठोस निर्णय घेतल्याने शासनाच्या या विधेयकाला शेकडो नागरिकांनी पत्र पाठवून समर्थन दर्शवले आहे. याप्रसंगी भाजपाचे तालुकाध्यक्ष संजय वाघ, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष विजय देशमुख, चंद्रशेखर काळे, छबीलदास चौधरी, त्र्यंबक कामडी, रमेश गालट, छगन चारोस्कर, सागर डोगमाने, प्रमोद शार्दुल, काशिनाथ भडांगे, लहु गवळी,हणुमंत भुसारे,गोरख भांगरे,धनराज ठाकरे,संजय पोटींदे,रघुनाथ चौधरी,राजेंद्र गवळी,भास्कर गवळी आदी उपस्थित होते.
नागरिकत्व विधेयकाच्या समर्थनार्थ पंतप्रधानांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 13:10 IST