शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे पंतप्रधान मोदी यांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 23:55 IST

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आहेत. कांद्याला वीस रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.

देवळा : तालुक्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांन पत्राच्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आहेत. कांद्याला वीस रुपये प्रतिकिलो हमीभाव देण्यात यावा, अशी मागणीही पंतप्रधान मोदींना पाठविलेल्या पत्रात करण्यात आली आहे.कांदा उत्पादक संघटनेने सुरू केलेल्या या उपक्रमास कांद्याचे बाजारभाव कोसळल्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकºयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. देवळा तालुक्यातील शेकडो कांदा उत्पादक शेतकºयांची पत्रे देवळा येथील पोस्ट कार्यालयातून रवाना झाली आहेत. त्यात विठेवाडी, खर्डे, सटवाईवाडी, देवळा, मटाणे, लोहोणेर, गुंजाळनगर आदी गावांतील शेतकºयांचा सहभाग आहे. पत्र पाठविताना शारीरिक अंतर पाळण्यात आले. यावेळी कांदा उत्पादक संघटनेचे प्रांतिक संपर्कप्रमुख कुबेर जाधव, राज्य संघटक कृष्णा जाधव, कांदा उत्पादक शेतकरी नानाजी आहेर, बापू देवरे, दशरथ पूरकर, विनोद आहेर, हितेंद्र आहेर, संकेत जाधव, भाऊसाहेब मोरे, किशोर आहेर, दीपक आहेर, पंकज आहेर, जिंतेद्र आहेर, दीपक गुंजाळ, शशिकात पवार, संदीप पवार आदी उपस्थित होते.

शहरी भागातील ग्राहकांच्या मानसिकतेतून कांदा हा जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत टाकल्यामुळे शेतकºयांचे नुकसान झाले. आता कांद्याला जीवनावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आल्यानंतरही कांद्याच्या बाजारभावात फरक पडलेला नाही. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी कांदा उत्पादक शेतकºयांना न्याय द्यावा, यासाठी पत्रप्रपंच केला आहे.- दशरथ पूरकर,कांदा उत्पादक, मांजरवाडी

चालूवर्षी सर्वच शेतमालाला कोरोनाचा फटका बसून शेती तोट्यात गेली. शेतकºयांची शेवटची आशा आता कांद्यावर आहे. कांद्याची शेतीही शाश्वत शेती होऊ शकते, हा विश्वास शेतकºयांमध्ये निर्माण करण्याची आवश्यकता असून, यासाठी केंद्र सरकारने शेतकºयांना दिलासा मिळेल, असे निर्णय घेण्याची गरज आहे.- नानाजी आहेर,कांदा उत्पादक, देवळा

टॅग्स :FarmerशेतकरीNarendra Modiनरेंद्र मोदी