शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर शिवसैनिक तुम्हाला पळवून लावतील"; शिंदेसेनेचा भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांना इशारा
2
गोंदियात EVM चं सील तोडल्याचा आरोप तर सांगलीत रातोरात मतदान वाढल्याचा दावा; स्टाँगरूमबाहेर राडा
3
पुणे पोलिसांनी अटक केलेली शीतल तेजवानी कोण? पार्थ पवारांच्या कंपनीसोबत केला होता जमिनीचा व्यवहार
4
इंडिगोची 'साडेसाती' संपता संपेना... आजच्या दिवशी तब्बल २०० विमान उड्डाणे रद्द, गोंधळ सुरूच
5
Sunny Leone : 'बेबी डॉल' झळकली शेतात; सनी लिओनीचे फोटो शेतकऱ्यांनी चक्क बांधावर लावले, कारण...
6
पुतिन यांच्या भेटीपूर्वी युरोपने भारताला युद्ध संपवण्याचे आवाहन केले; म्हणाले, ते तुमचे ऐकतात...'
7
कोण आहे 'ती' इराणी मुलगी; जिच्यावर अमेरिकेनं लावलंय हाफिज सईद इतकं इनाम!
8
'Bata' हा भारतीय फुटवेअर ब्रँड आहे का? अनेक जण करतात ही चूक; पाहा कोणते ब्रँड्स आहेत स्वदेशी आणि कोणते विदेशी?
9
नागपूर हिवाळी अधिवेशन सात दिवसांचेच शनिवार, रविवारी कामकाज; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे सावट
10
रशियात भारतीय १०० रुपयांचे मूल्य किती! व्यापारावर याचा थेट कसा परिणाम होतो?
11
मुंबईत दुबार मतदारांचा गोंधळात गोंधळ सुरुच; पहिल्याच प्रयोगात नावाशी साधर्म्य असणारेच सर्वाधिक मतदार
12
केकेआरला पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, त्यानेच मैदान गाजवलं; २१५ च्या स्ट्राइकनं केल्या धावा
13
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ॲप अनिवार्य नाही; सर्व बाजूंनी टीका झाल्यानंतर सरकारची माघार
14
"मी इतकंच सांगेन की...", विजय देवरकोंडासोबत लग्नाच्या चर्चांवर रश्मिका मंदानाने सोडलं मौन
15
Video: बिहारमध्ये लग्नाच्या पंगतीत रसगुल्ले कमी पडल्यानं तुंबळ हाणामारी; वऱ्हाडी भिडले अन्...
16
मुलींसाठी LIC ची जबरदस्त स्कीम, ₹१२१ रुपयांच्या बचतीतून मिळेल लाखोंचा रिटर्न; कोणती आहे योजना?
17
पतीची हत्या करून ड्रममध्ये टाकणाऱ्या मुस्कानची नवी मागणी; म्हणे, मुलीचा चेहरा प्रियकराला दाखवायचाय!
18
शेअर बाजारात आधी घसरण मग सावरला; सेन्सेक्समध्ये ३५ अंकांची तेजी, निफ्टी २५,९९५ च्या पुढे
19
कर्जासाठी कायपण! पाकिस्तानला विकावी लागणार सरकारी विमान कंपनी; 'फिल्ड मार्शल' मुनीर यांचा डोळा
20
"डोळे मिट, मनात इच्छा धर, फुंकर मार"... रोहित शर्मा- ऋषभ पंत यांचा भर मैदानात वेगळाच 'खेळ'; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित ठरावाबाबत चक्क महापौरांना विचारणारे पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2018 01:24 IST

महापौर रंजना भानसी यांच्या कार्यालयाकडे ५२ ठराव प्रलंबित असल्याचे पत्र चक्क नगरसचिवांनी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, महापौरांनी हे पत्र नाकारतानाच नगरसचिवाची खरडपट्टी काढली आणि त्या पत्रालाही केराची टोपली दाखविल्याचे वृत्त आहे.

नाशिक : महापौर रंजना भानसी यांच्या कार्यालयाकडे ५२ ठराव प्रलंबित असल्याचे पत्र चक्क नगरसचिवांनी देण्याचा धक्कादायक प्रकार घडला असून, महापौरांनी हे पत्र नाकारतानाच नगरसचिवाची खरडपट्टी काढली आणि त्या पत्रालाही केराची टोपली दाखविल्याचे वृत्त आहे.  महापौर हे शहराच्या दृष्टीने मानाचे पद असून, नगरीचे प्रथम नागरिक म्हणून त्यांना मान असतो. महापालिकेत १९९२ मध्ये लोकप्रतिनिधींची राजवट सुरू झाली. तेव्हापासून आत्तापर्यंत म्हणजेच २६ वर्षांत आजपर्यंत यापदाची मानमर्यादा पाळली गेली. महापालिकेच्या प्रशासनाशी अथवा लोकप्रतिनिधींशी किती मतभेद असले तरी या पदाची प्रतिमा कायम जपली गेली. इतकेच नव्हे तर काही महापौरांच्या काळात इतिवृत्त आणि ठराव विलंबाने मिळाले तरी आजवर कोणत्याही प्रशासन अधिकाऱ्याने महापौरांना विचारणा करण्याचा प्रकार घडला नव्हता; मात्र यंदा तो घडला आहे.  महापौर रंजना भानसी यांच्याकडे ठराव प्रलंबित असल्याने आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नगरसचिवांकडे त्याबाबत विचारणा केली आणि प्रलंबित ठरावासाठी चक्क नगरसचिवांनी महापौरांना पत्र देऊन विचारणा केली. यासंदर्भातील पत्र महापौरांच्या स्वीय सहायकांकडे देण्यात आले होते; मात्र महापौरांनी ते स्वीकृत न करता त्याला केराची टोपली दाखवून नगरसचिवांची झाडाझडती घेतली.  महापौर रंजना भानसी यांनी यासंदर्भात सांगितले की, कोणाच्या सांगण्यावरून मी ठराव तत्काळ द्यावे अशी अपेक्षा असेल तर मुळातच चुकीची आहे. कोणत्याही विषयाचा ठराव करताना त्याची पार्श्वभूमी लक्षात घ्यावी लागते. ठरावाचे बरे वाईट परिणाम तर होणार नाही ना याची काळजी घ्यावी लागते.अन्यथा चुकीच्या ठरावांमुळे वेगवेगळे परिणाम संभवतात. त्याच मुळे ठराव पाठविण्यास विलंब होऊ शकतो; परंतु म्हणून कोणी त्यावर जाब विचारू शकत नाही, असे त्यांनी स्पष्ट सांगितले.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका