शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

केरळसाठी नाशिकमधून मदत रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2018 00:26 IST

नाशिक : केरळमधील पूरपरिस्थिती राष्टय संकट असल्याचे जाहीर झाल्याने तेथील पूरग्रस्तांना नाशिक जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला असून औषधे, कांदा, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसह रोख स्वरूपातील मदतही केरळ सरकारच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे.पालकमंत्री गिरीश महाजन हे केरळ येथे वैद्यकीय पथकासह रवाना झाल्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार ...

नाशिक : केरळमधील पूरपरिस्थिती राष्टय संकट असल्याचे जाहीर झाल्याने तेथील पूरग्रस्तांना नाशिक जिल्ह्यातून मदतीचा ओघ सुरू झाला असून औषधे, कांदा, तांदूळ यांसारख्या जीवनावश्यक वस्तूंसह रोख स्वरूपातील मदतही केरळ सरकारच्या बॅँक खात्यात जमा करण्यात आली आहे.पालकमंत्री गिरीश महाजन हे केरळ येथे वैद्यकीय पथकासह रवाना झाल्यामुळे त्यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत आमदार राहुल अहेर यांनी पालकमंत्री यांच्या संपर्क कार्यालयात केरळ पूरग्रस्तांसाठी मदत गोळा करण्यास सुरुवात केली आहे. आमदार अहेर यांनी वसंतदादा सहकारी साखर कारखान्यातर्फे पाच टन साखर, घोटीच्या राईस मिल असोसिएशनतर्फे ४ टन तांदूळ तसेच कांदा व्यापारी असोसिएशनने २० टन कांदा, नाशिक जिल्हा केमिस्ट असोसिएशन आणि जिल्हा रुग्णालयातर्फे एक लाख रुग्णांना पुरेल इतका आपत्कालीन वैद्यकीय औषधांचा ट्रक रवाना करण्यात आला आहे.सदरचे साहित्य उद्यापर्यंत कोच्ची येथील मदत केंद्रात पोहोचणार असल्याचे पालकमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी संदीप जाधव यांनी सांगितले.कोणताही अधिभार नाही  मालेगाव मर्चंट बॅँकेच्या वतीने एक लाख व जनकल्याण ट्रस्टच्या वतीने २५ हजार अशा प्रकारे सव्वा लाख रुपयांचा धनादेश मंगळवारी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांच्याकडे बॅँकेचे अध्यक्ष नरेंद्र सोनवणे, राजेंद्र भोसले, विठ्ठल बागुल, भास्कर पाटील यांनी सुपूर्द केला. केरळ पूरग्रस्तांसाठी रोख स्वरूपात मालेगाव मर्चंट बॅँकेच्या माध्यमातून मदत पाठवू इच्छिणाऱ्यांसाठी बॅँकेकडून कोणताही अधिभार आकारण्यात येणार नसल्याचे बॅँकेने म्हटले आहे.

टॅग्स :floodपूर