शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

चला.. गमतीला चला.. बहुरूपी आला..

By admin | Updated: October 21, 2016 23:48 IST

ओझर : दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी करमणूक

सुदर्शन सारडा  ओझरएकेकाळी वर्षभर गावात फिरून ग्रामस्थांची करमणूक करणारा बहुरूपी हल्ली दिवाळीच्या दिवसांत येतात. ओझरच्या गल्लीबोळात घराबाहेर ओट्यावर बसून एखाद्याची फिरकी घेत गंमत करणारे बहुरूपी फिरत आहेत. बीड, उस्मानाबाद या परिसरातील हे बहुरूपी नागरिकांचे मनोरंजन करीत असल्याने ते लहान मुलांचेही आकर्षण झाले आहेत. घराबाहेर ओट्यावर बसलेल्या ग्रामस्थांच्या घोळक्यात जाऊन पोलीस बनून आलेला बहुरूपी अंगणात बसलेल्या काकांना म्हणतो, ‘साहेब, तुमच्या नावाचं वॉरंट आणलं आहे.’ कसले वॉरंट असे विचारताच बहुरूपी म्हणतो, ‘गेल्या दिवाळीत तुम्ही तयार केलेल्या करंज्यामध्ये साखरच नव्हती अशी तुमच्या घरी येऊन गेलेल्या पाहुण्यांची तक्रार आहे.’ हे ऐेकून तसेच पोलीस बनून आलेल्या या बहुरूपी कलावंंताने घातलेले कपडे बघून हा बहुरूपी असल्याचे काका ओळखतात आणि त्याच्याच गमतीशीर भाषेत ते त्याच्याशी बोलू लागतात. आपल्या भागातील एका माणसाशी पोलीस हुज्जत घालत आहे हे बघून ज्यांनी या बहुरूपीला ओळखले नाही ते गंभीर होतात. बहुुरूपीने घातलेला वाद चांगलाच रंगत आणत असल्याने ज्यांनी त्याला ओळखले त्यांचे मनोरंजन होेते. गमतीशीर संवाद रंगात आल्यानंतर हा बहुरूपी पोलीस काकांना दंड आकारतो व ‘चला दहा रुपये काढा व प्रकरण मिटवून टाका’ असे म्हणतो. काकादेखील हसत हसत राजीखुशीने त्याला पैसे काढून देतात. मग अन्य उपस्थितांनाही कळते की हा मनोरंजन करणारा बहुरूपी आहे. हा प्रसंग बघायला आलेल्या गर्दीतून काही जण स्वखुशीने या बहुरूपीला आर्थिक मदत करतात.  एकेकाळी गावागावांत लोकप्रिय ठरलेला बहुरूपी हा कलाप्रकार आता दुुर्मीळ होत चालला आहे. नवीन पिढीला हा प्रकार माहिती नसल्याने त्यांना बघून लहान मुले आधी घाबरतात. नंतर तेही या बहुरूपीबरोबरच्या गमतीशिर गप्पांमध्ये सहभागी होतात. ओझरच्या गल्लीबोळात गेल्या काही दिवसांपासून असे मनोरंजन सुरू आहे.