शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

किसान सभेचे चलो दिल्ली, २१ रोजी नाशिकमधून मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 16:07 IST

दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला बळ

ठळक मुद्देमोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच आठ ते दहा दिवस सर्वांना दिल्लीच्या सीमेवर रहावे लागणार

सुरगाणा : अखिल भारतीय किसान सभेच्या महाराष्ट्र राज्य कौन्सिलची ऑनलाईन बैठक होऊन यात दिल्ली येथे सुरू असलेल्या आंदोलनात प्रत्यक्ष सहभागी होण्यासाठी महाराष्ट्रातून हजारो शेतकऱ्यांचा वाहन मोर्चा थेट दिल्लीला घेऊन जाण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.दिनांक २१ डिसेंबर २०२० रोजी नाशिक येथून या भव्य शेतकरी मोर्चाला सकाळी ११ वाजता सुरुवात होईल. नाशिक, ठाणे - पालघर व अहमदनगर जिल्ह्यातून मोर्चात सहभागी होणारे शेतकरी सोमवारीसच सकाळी ११ वाजेपर्यंत नाशिक येथे पोहचतील. महाराष्ट्र मधील अन्य जिल्ह्यातून मोर्चात सहभागी होण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांनी रविवारी ( दि. २०) रात्री मुक्कामी नाशिक येथे पोहोचणार असल्याचे सांगण्यात आले.दिल्ली मोर्चात सहभागी होण्यासाठी तसेच आठ ते दहा दिवस सर्वांना दिल्लीच्या सीमेवर रहावे लागणार असल्याने वाहने, डिझेल, भरपूर गरम कपडे, भोजन, पाणी, सॅनिटायजर, त्यासाठी लागणारे पैसे यासह संपूर्ण तयारी संबंधित जिल्ह्यांनी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या या संघर्षात संपूर्ण ताकदीने सहभागी होणार असल्याचेडॉ.अशोक ढवळे, माजी आमदार जे.पी.गावीत, किसन गुजर, अर्जुन आडे, उमेश देशमुख, डॉ. अजित नवले यांनी म्हटले आहे.

टॅग्स :NashikनाशिकMorchaमोर्चा