शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

लष्कर भरतीप्रसंगी लाठीमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2018 01:42 IST

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या युवकांची लष्कर भरतीप्रसंगी चांगलीच धावपळ उडाली.

देवळाली कॅम्प : देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून राज्यभरातील विविध जिल्ह्यांमधून दाखल झालेल्या युवकांची लष्कर भरतीप्रसंगी चांगलीच धावपळ उडाली. हजारोंच्या संख्येने आलेल्या तरुणांमध्ये भरतीसाठी रेटारेटी झाल्याने उडालेल्या गोंधळात लष्कर आणि पोलिसांना सौम्य लाठीमार करून परिस्थिती नियंत्रणात आणावी लागली. यावेळी झालेल्या धावपळीत अनेक तरुण जखमी झाले, तर रस्त्यावर त्यांच्या चपला-बूट विखुरले गेले तर काहींचे कागदपत्रेही गहाळ झाले.  रविवारपासून सुरू झालेल्या या भरतीप्रक्रियेसाठी देशभरातील तरुणांचा लोंढा देवळाली कॅम्पमध्ये दाखल झाला आहे. सुमारे ९० जागांसाठी १५ हजारपेक्षा जास्त युवकांनी सहभाग नोंदवल्याने भरतीच्या ठिकाणी एकच गोंधळ उडाला. पुढे जाण्यासाठी तरुणांची चढाओढ लागल्याने जमाव विस्कळीत झाला आणि गोंधळलेल्या अवस्थेत रेटारेटीमुळे चेंगराचेंगरीचाही प्रकार घडला. त्यामुळे तरुणांच्या जमावाला नियंत्रणात आणण्यासाठी लष्कराला लाठीमार करावा लागला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला. यावेळी झालेल्या धावपळ व चेंगराचेंगरीत काही तरुण जखमी झाले.लष्करी विभागाच्या पायदळ, भूदल म्हणून मोठ्या प्रमाणावर प्रादेशिक सेनेच्या ११६ पॅराट्रूप बटालियनमध्ये भरती सुरू झाली आहे. या भरतीसाठी हजारोंच्या संख्येने तरुणांनी हजेरी लावली. तरुणांची गर्दी झाल्याने गर्दीला नियंत्रणात आणण्यासाठी लष्कर आणि पोलिसांना चांगलीच कसरत करावी लागली. तरुणांचा लोंढा सातत्याने पुढे रेटत असल्याने अधिक बंदोबस्त वाढविण्यात आला. पहाटेच्या सुमारास भरतीप्रक्रिया सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणावर युवकांची गर्दी झाल्याने लष्करी विभागाकडून गर्दीवर ताबा मिळविण्यासाठी लाठीमार करण्यात आला. पहाटे झालेल्या धावपळीच्या घटनेत अनेकांचे बूट, चपला रस्त्यातच पडल्या, दोन ठिकाणी चारचाकी गाड्या फोडण्यात आल्याने पोलिसांनी दंगा निवारण पथक, क्यूआरटी, वाहतूक विभाग, वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पाच पोलीस निरीक्षक, २०० पोलिसांसह गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात आले. या धावपळीत मात्र अनेक तरुण जखमी झाले.लाठीमारचा बसला फटकालष्कर भरतीसाठी रविवारी रात्रीपासूनच आनंदरोड मैदानावर महाराष्ट्रातील युवकांनी मोठी गर्दी केल्याने त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाची एकच धावपळ उडाली. लष्कराच्या टीए भरतीकरिता अपेक्षित संख्येपेक्षा जास्त युवकांनी हजेरी लावल्याने आनंदरोड मैदानालगत रस्त्यावर सकाळी ४ ते ५ वाजेच्या दरम्यान पोलिसांनी लाठी चार्ज केल्याने एकच धावपळ उडाली.लाठीचार्जच्या भीतीने भरतीकरिता आलेल्या युवकांमध्ये धावपळ उडाल्याने अनेकांना चेंगराचेंगरीचा फटका बसला. यावेळी काही युवक जखमी झाल्याचे व त्यांच्यावर बिटको रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले, मात्र पोलीस प्रशासनात याबाबत कुठलीही नोंद करण्यात आली नाही.भरतीसाठी पर राज्यांतून आलेल्या उमेदवारांसाठी देवळालीतील शिवसेना, मनसे यांसह गुरुद्वारा व झुलेलाल मंदिर येथे चहा, नाश्तासह दोन वेळच्या जेवणाची सोय करण्यात आली होती. मंगळवारी फक्त नाशिक जिल्ह्यातील युवकांकरिता भरतीप्रक्रिया होणार आहे.नाशिकचा पारा सध्या १० अंशांपेक्षा कमी असल्याने थंडीचा जोर वाढला आहे. अशा कडाक्याच्या थंडीतही लष्करी भरतीसाठी दाखल झालेल्या तरुणांनी शेकोटीचा आधार घेत रात्र जागून काढली, तर कुणी चहाचा आधार घेत थंडीपासून बचाव करीत होते.

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानNashikनाशिक