- रोहिणी महाले, नगराध्यक्ष, कळवण
२०१४ ते १९ या काळात राज्यात भाजप-सेना युतीचे सरकार होते. तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन, आमदार डॉ. राहुल आहेर यांनी कळवण नगरपंचायतला निधी उपलब्ध करून दिल्यामुळे शहरांत विकासकामे झाली हे सत्य नाकारून चालणार नाही. नगरपंचायत अंतर्गत विकासकामांना कधीही अडथळे आणले नाहीत. भाजप सरकारच्या काळात आमदार डॉ. आहेर यांनी मिळवून दिलेला निधी आणि झालेली विकासकामे, शहराच्या सर्वांगीण विकासकामांचा आराखडा जनतेपुढे ठेवून आम्ही निवडणुकीला सामोरे जाऊ.
- सुधाकर पगार, गटनेते, भाजप
इन्फो...
पगारांचे प्राबल्य अन् निवडणूक
कळवण शहर हे पगाराचे गाव म्हणून ओळखले जाते. शहरातील सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक, सहकार आणि आध्यत्मिक क्षेत्रातील काम हे पगारांचा सहभाग असल्याशिवाय पूर्ण होत नाही त्याप्रमाणे शहरातील संस्था, नगरपंचायत निवडणुका किंवा राजकारणदेखील पगारांशिवाय पूर्ण होत नाही. त्यामुळे पगारांची भूमिका तेवढीच महत्त्वपूर्ण आहे. कळवण नगरपंचायतच्या प्रथम नगराध्यक्षपदाचा मान सुनीता पगार यांनाच मिळाला असून, वेगवेगळ्या पक्षांत आणि गटातटात विखुरलेल्या पगारांचे राजकारणदेखील एकमेकांच्या विरोधात चर्चा करूनच आहे. नगरपंचायत निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात आणि भाऊबंदकीच्या संशयकल्लोळात राजकीय वातावरण तापते.