शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

सैनिकांच्या त्यागाची प्रत्येकाने आठवण ठेवावी : प्रभूदेसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 00:59 IST

कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात.

नाशिक : कारगिलची शौर्यगाथा पाहताना सैनिकांच्या साहसाचे दर्शन घडते. आपल्या प्राणाची पर्वा न करता भारतीय सैनिक हिमालयाच्या टोकावर जवळपास १८ हजार फुटांवरील सीमेवर रात्रं-दिवस उणे ४० ते ५० अंश सेल्सिअस तपमानात डोळ्यात तेल घालून मृत्यूशी झुंज देत असतात. अशा परिस्थितीत देशवासीयांच्या संरक्षणासाठी लढणाऱ्या सैनिकांच्या धैर्य व त्यागाची समाजाने आठवण ठेवून प्रत्येक सैनिकाबद्दल भारतीयाला आदर आणि अभिमान असायला हवा, असे मत अनुराधा प्रभूदेसाई यांनी येथे व्यक्त केले.  गोदाघाटावरील नाशिक वसंत व्याख्यानमालेचे सातवे पुष्प प्रभूदेसाई यांनी सोमवारी (दि. ७) गुंफले. माजी खासदार दिवंगत अ‍ॅड. उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘ऋणानुबंध सैनिकांशी-कारगिलची शौर्यगाथा’ या विषयावर बोलताना अनुराधा प्रभूदेसाई यांनी लेह, लडाख, द्रास, कारगिल प्रांतात प्राणपणाने झुंज देणाºया सैनिकांचे जीवनमान नाशिककरांसमोर मांडले. ज्या सैनिकांचे अदम्य साहस आणि शौर्याच्या जोरावर आपण देशात सुरक्षित आहोत त्या सैनिकांच्या त्यागाची समाज आठवण ठेवत नाही, याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, बॉलिवूडच्या तारेतारकांच्या आयुष्यातील प्रत्येक घटनेची माहिती प्रत्येकाला असते. परंतु देशातील परमवीरचक्र सन्मानित सैनिकांची नावे आपल्याला माहिती नाहीत, ही शोकांतिका आहे. कारगिल युद्धातील पहिले शहीद कॅप्टन सौरभ कालिया यांचे बलिदान आणि नंतरच्या यातना आपल्याला ठाऊक नाही. कॅप्टन विक्र म बात्रांचे कार्य माहिती नाही. काश्मीर किंवा अरुणाचलसारखा प्रदेश आपल्या नकाशावरून पुसला जातो आणि आपला नकाशा लहान होतो, यांसारखी लांच्छनास्पद गोष्ट नाही. देशाच्या सीमेचे रक्षण, पलटन की इज्जत या गोष्टींसाठी आपला सैनिक बर्फवृष्टी, हिमप्रपात, गोळीबार यांची पर्वा न करता तिथे उभा असतो, त्याची आठवण ठेवून सर्वांनी भारतीय सैन्याच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

टॅग्स :Nashikनाशिक