शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या ग्रुहउद्योगांबरोबर मातीपरिक्षणाचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2020 14:52 IST

देवळा : लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय बंद असल्यामुळे घरी परतलेल्या तालुक्यातील भऊर येथील सुजाता पवार या कृषी शाखेच्या विद्यार्थीनीने आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग करत शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहीती व महिलांना गृहउद्योगाचे धडे देण्याचा उपक्र म सुरू केला आहे.

ठळक मुद्देदेवळा : आत्मनिर्भरासाठी कृषि तंत्रज्ञानाच्या विद्यार्थीनीची धडपड !

देवळा : लॉक डाऊन जाहीर झाल्यानंतर महाविद्यालय बंद असल्यामुळे घरी परतलेल्या तालुक्यातील भऊर येथील सुजाता पवार या कृषी शाखेच्या विद्यार्थीनीने आपल्या शैक्षणिक ज्ञानाचा उपयोग करत शेतकऱ्यांना कृषी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञानाची माहीती व महिलांना गृहउद्योगाचे धडे देण्याचा उपक्र म सुरू केला आहे.सुजाता कोकण कृषी विद्यापीठात बीएससी अ‍ॅग्री चौथ्या वर्षाचे शिक्षण घेत आहे. ती गावातील महिलांना गृहउद्योगाचे धडे तसेच स्थानिक शेतकऱ्यांनाही कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञानाची ती माहिती देत आहे.परिसरातील महिलांना आंब्यापासून जाम, आंबा पोळी, आमचूर, सिरप, स्क्वॅश, लोणचे या सारखे विविध पदार्थ तयार करणे, पनीर तयार करणे, आदी विविध गोष्टी अंतिम वर्षाच्या प्रकल्पांतर्गत शिकवत आहे. तिच्या या प्रकल्पामुळे शेतीपुरक गृहउद्योगांची माहिती महिलांना मिळत आहे. तसेच माती परिक्षणाचे महत्व, पद्धती, फायदे यांची माहिती शेतकºयांना देत आहे.ग्रामीण जागरूकता कार्य अनुभव हा कृषी पदव्युत्तर शिक्षणाच्या चौथ्या वर्षामध्ये सादर केला जातो, कृषी विद्यार्थ्यांना खेड्यातील परिस्थिती, शेतातल्या कुटूंबीयांसमवेत काम, त्यांच्या अडचणी ओळखण्यासाठी व आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करण्यासाठी, त्यांचे रोजगार आणि कौशल्य सुनिश्चित करण्यासाठी हा कार्यानुभव आवश्यक असतो. कृषी क्षेत्रातील उद्योजकता वाढवणे हा त्याचा प्रमुख उद्देश आहे. या गोष्टी कोरोना लॉक डावुनच्या कारणास्तव फक्त कागदावर राहू नये म्हणून व आपल्या परिसरातील महिलांच्या हाताला भविष्यात रोजगार उपलब्ध व्हावा या उद्देशाने मी हे प्रशिक्षण सुरू केलं आहे.- सुजाता प्रकाश पवार, भऊर.भऊर येथे शेतकर्यांना पीकांतील नवीन तंत्रज्ञाना बद्दल माहीती देतांना सुजाता पवार.

टॅग्स :agricultureशेतीStudentविद्यार्थी