शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना स्वसंरक्षणाचे धडे :  आदित्य ठाकरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 00:23 IST

शिवसेना वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करीत असून, याच माध्यमातून शिवसेनेच्या वतीने राज्यभर कामकाज सुरू आहे.

सिडको : शिवसेना वीस टक्के राजकारण व ऐंशी टक्के समाजकारण करीत असून, याच माध्यमातून शिवसेनेच्या वतीने राज्यभर कामकाज सुरू आहे. याबरोबरच मुलींवर होणाऱ्या वाढत्या अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी व त्यांना प्रतिकार करण्यासाठी युवासेनेच्या वतीने स्वसंरक्षणाचे धडे देण्यात येणार असल्याने शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी सांगितले.  सिडको प्रभाग २५ मध्ये नगरेसवक सुधाकर बडगुजर व सिडको प्रभाग सभापती हर्षा बडगुजर यांच्या वतीने आयोजित मोफत सर्वरोगनिदान शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ठाकरे बोलत होते. अशा प्रकारच्या आरोग्य शिबिराबरोबर शिवसेना पक्षाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर महिला व मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे महिलांना अन्याय अत्याचाराविरोधात लढण्यास ताकद मिळेल.  कार्यक्रमास शिवसेना युवासेना नेते वरुण सरदेसाई, संपर्क नेते भाऊ चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, जिल्हाप्रमुख विजय करंजकर, अजय बोरस्ते, महानगर प्रमुख महेश बडवे, माजी जिल्हाप्रमुख दत्ता गायकवाड, पश्चिम मतदारसंघ संपर्कप्रमुख नीलेश चव्हाण, सचिन मराठे, विनायक पांडे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख मंदा दातीर, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, शिरीष लवटे, श्यामकुमार साबळे, कल्पना पांडे, संगीता जाधव, पुंजाराम गामणे, माणिक जायभावे आदी उपस्थित होते.याप्रसंगी दीपक बडगुजर, पवन मटाले, सुभाष गायधनी, भूषण देवरे, देवेंद्र शेलार उपस्थित होते तर अपोलो हॉस्पिटलचे डॉ. सुधीर शेतकर, डॉ. अनिल जाधव, डॉ. अरुण खरे, डॉ. प्रवीण गोवर्धन, डॉ. मिलिंद शहा, डॉ. शरद देशमुख, डॉ. जितेंद्र शुक्ल या टीमने रुग्णांची तपासणी केली.सावतानगर येथे सर्वरोगनिदान शिबिरात सहाशेहून अधिक रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली. सिडको परिसरातील प्रभाग २५ मधील सावता नगर परिसरात शिवसेना पक्ष, श्री साई ज्येष्ठ नागरी संघ, प्रभाग सभापती हर्षा बडगुजर व नगरसेवक सुधाकर बडगुजर यांच्या वतीने सर्वरोगनिदान आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv Senaशिवसेना