शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Assembly Election Result 2025 Live Updates: मतमोजणीला सुरूवात; सुरुवातीच्या कलांमध्ये NDA आघाडीवर
2
बॉलिवूड पार्ट्यांमध्ये अंडरवर्ल्डकडून ड्रग्ज सप्लाय; श्रद्धा कपूर, नोरा फतेही, ओरीसह टॉप सेलिब्रिटींची नावे उघड
3
दिल्लीत स्फोट घडवणाऱ्यांना कडक इशारा; मास्टरमाईंड डॉ. उमरचे पुलवामातील घर IED स्फोटकांनी उडवले!
4
आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
5
“अजित पवार सत्तेसाठी लाचार असल्याने ते सत्तेतून बाहेर पडण्याचा प्रश्नच नाही”; काँग्रेसची टीका
6
नितीशराज की तेजस्वी पर्व? बिहारचा आज फैसला
7
३ राजयोगात उत्पत्ति एकादशी २०२५: ७ राशींना शुभ, उच्च पद मिळेल; अकल्पनीय लाभ, अनपेक्षित यश!
8
नगरपरिषद-नगरपंचायत निवडणुकांसाठी शिवसेनेचे प्रभारी जाहीर; DCM एकनाथ शिंदेंकडून घोषणा
9
मुंब्रा रेल्वे अपघात; ‘त्या’ दोन अभियंत्यांना कोणत्याही क्षणी अटक? अटकपूर्व जामीन कोर्टाने फेटाळला
10
रेल्वे प्रवाशांना पुन्हा खिंडीत गाठणार? ‘वर्क टू रुल’साठी सेंट्रल रेल्वे कर्मचारी करणार आंदोलन
11
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
12
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास, कोण आहेत ते?
13
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
14
डाॅक्टरसाहेब, मधुमेह होऊच नये, यासाठी काय करावे? चाळिशीनंतर करा नियमित तपासणी
15
आता झोपडीधारकाची संमती गरजेची नाही, झोपडपट्टीमुक्त मुंबईसाठी सलग ५० एकर क्षेत्रावर होणार समूह पुनर्विकास
16
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
17
यंदाचा कुंभमेळा पाच पट अधिक मोठा, ५,६५८ कोटींच्या कामांचे मुख्यमंत्र्यांनी केले भूमिपूजन
18
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
19
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
20
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेचे धडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 01:06 IST

फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन, फेसबुक अकाउंट होल्डरवर गुन्हे दाखल होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत़

नाशिक : फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप या सोशल मीडियाचा चुकीचा वापर केल्यामुळे व्हॉट्सअ‍ॅप अ‍ॅडमिन, फेसबुक अकाउंट होल्डरवर गुन्हे दाखल होण्याबरोबरच कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागल्याच्या घटना घडल्या आहेत़  शाळा तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना या सोशल मीडियाचे फायदे - तोटे तसेच धोके यांची जाणीव व्हावी यासाठी शहर पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्र सिंगल यांनी सायबर सुरक्षिततेचे धडे देण्याचा उपक्रम वर्षभरापूर्वी सुरू केला होता़ या उपक्रमाचा गत वर्षभरात सुमारे दोन लाख महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, त्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यात आले आहेत़प्लॅस्टिक मनी ही तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येकाचीच गरज बनली आहे़ मात्र याच तंत्रज्ञानाचाच दुरुपयोग तसेच हाताळणीतील चुकांमुळे तंत्रज्ञान अवगत असलेल्या भामट्यांकडून आॅनलाइन पद्धतीने बँकेतील पैसे काढून घेणे, एटीएम क्लोनिंग, पासवर्ड हॅकिंग याद्वारे पैशांची अफरातफर केली जाते आहे़ याबरोबरच नोकरीचे आमिष दाखवून तसेच मेट्रीमॅन्यूअल साईटवरूनही फसवणूक केली जात असून चोरीचे नवनवीन फंडे अमलात आणले जात आहेत़ त्यामुळे सायबर सुरक्षिततेचे धडे ही काळाची गरज बनली आहे़मोबाइल व सोशल मीडियाच्या वापरात शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे़ पोलीस आयुक्त सिंगल यांनी पोलीस आयुक्तालयमार्फत विद्यार्थ्यांना सोशल मीडियाची हाताळणी कशी करावी, सोशल मीडियातील धोके, आॅनलाइन पद्धतीची फसवणूक, नोकरीच्या आमिषाने केली जाणारी फसवणूक, विवाहाच्या संकेतस्थळावरून तरुण-तरुणी वा विधवा महिलांची होणारी फसवणूक याबाबत माहिती व्हावी, यासाठी वर्षभरापासून सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यास सुरुवात केली़ गत वर्षभरात शहरातील २०० ते २५० शाळा व महाविद्यालयांमधील दोन लाख विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे देण्यात आले आहेत़सायबर अ‍ॅम्बॅसिडर संकल्पनापोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी सायबर सुरक्षिततेसाठी एक स्वतंत्र पथक निर्माण केले असून त्यांच्यामार्फत शहरातील विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षिततेचे धडे दिले जातात़ या पथकाने सायबर विषयातील तज्ज्ञ तसेच संगणक शाखेतील विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन सायबर अ‍ॅम्बॅसिडर म्हणून नेमले आहे़ हे सायबर अ‍ॅम्बॅसिडर पोलीस पथकासमवेत शाळा तसेच महाविद्यालयांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह सायबर सुरक्षिततेचे धडे देतात़विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पालक मोबाइल देतात मात्र, या मोबाइलचा वापर आपला पाल्य नेमका कशासाठी करतो याकडे मात्र सोयीस्कर दुर्लक्ष करतात़ विद्यार्थ्यांच्या हातात आलेल्या या तंत्रज्ञानातील विविध सोशल मीडियाचा वापरातील धोक्यांबाबत त्यांना जाणीव व्हावी यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे़ या उपक्रमासाठी शंभर ते दीडशे सायबर अ‍ॅम्बॅसिडर तयार करण्यात आले असून पोलीस व अ‍ॅम्बेसिडर यांच्याकडून सायबर सुरक्षिततेचे धडे देण्याचा उपक्रम सुरू आहे़- डॉ़ रवींद्र सिंगल, पोलीस आयुक्त, नाशिक

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमNashikनाशिकStudentविद्यार्थी