शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरण थोडे, झुंबड जास्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 01:18 IST

शुक्रवारी शहरातील २५ केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. बहुतांश केंद्रांवर उपलब्ध लसींपेक्षा नागरिकांच्या रांगाच मोठ्या प्रमाणात होत्या. केंद्रांवर दीडशे ते पावणेदोनशे लसी देऊन लस थांबविण्यात आल्याने अनेक नागरिकांना लसींविना माघारी परतावे लागले. 

ठळक मुद्देचिंताजनक : ॲपवरील नोंदणीविनादेखील नागरिकांची गर्दी

नाशिक : शुक्रवारी शहरातील २५ केंद्रांवर लसीकरणासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. बहुतांश केंद्रांवर उपलब्ध लसींपेक्षा नागरिकांच्या रांगाच मोठ्या प्रमाणात होत्या. केंद्रांवर दीडशे ते पावणेदोनशे लसी देऊन लस थांबविण्यात आल्याने अनेक नागरिकांना लसींविना माघारी परतावे लागले. नाशिक शहरातील सर्व उपनगरांमध्ये तर सकाळी ७ वाजेपासूनच नागरिकांनी लसीकरणासाठी रांगा लावल्या होत्या. त्यात विशिष्ट केंदांवर १८ ते ४४ वयोगटातील नोंदणी केलेल्या नागरिकांनाच लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. त्यामुळे रांगेत उभे राहिलेल्या अनेक  ज्येष्ठांना लस न घेताच माघारी परतावे लागले. बहुतांश केंद्रांवर केवळ पहिली लस घेणाऱ्या नागरिकांनाच लस उपलब्ध असल्याचे जाहीर केल्याने दुसरी लस घेऊ इच्छिणाऱ्यांचा हिरमोड झाला. तर, काही केंद्रांवर शेकडो नागरिक नाव नोंदवून रांगेत उभे असताना केवळ पहिल्या १०० जणांना डोस देऊन लसीकरण थांबविण्यात आल्याने अन्य नागरिकांनाही लसींविना परतावे लागले. रांगेत उभ्या असलेल्या नागरिकांपैकीदेखील १७० ते २००  नागरिकांनाच लसी मिळू शकल्या. शुक्रवारी काही केंद्रांवर कोव्हॅक्सिन तर काही केंद्रांवर कोविशिल्ड लसींचा साठा उपलब्ध होता. त्यामुळे उपलब्धतेनुसार लसीकरण करण्यात आले. काही केंद्रांवर केवळ कोव्हॅक्सिन तर काही केंद्रांवर केवळ कोविशिल्ड असे वर्गीकरणदेखील करण्यात आले होते. त्यामुळे नागरिकांना त्या केंद्रांवर जी लस उपलब्ध असेल, तीच घ्यावी लागली. गर्दीवर नियंत्रण झाले अवघडलसीकरण केंद्रांवर केवळ आधीच ॲपवरून नावनोंदणी केलेल्या नागरिकांनाच प्रवेश दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले असूनही केंद्रांवर होणारी गर्दी नियंत्रणाबाहेर जात आहे. ॲपवर निर्धारित वेळेच्याही खूप आधीपासून रांगा लागत असल्याने या रांगांचे नियंत्रण करणे केंद्रांनादेखील मुश्कील झाले आहे. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCorona vaccineकोरोनाची लस