शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्या जेरबंद; जोगलटेंभीत समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:53 IST

जोगलटेंभी येथे शनिवारी (दि.२३) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जखमी झाला आहे.

नायगाव : येथून जवळच असलेल्या जोगलटेंभी येथे शनिवारी (दि.२३) रात्री बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले. बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे. बिबट्या जखमी झाला आहे.सिन्नर तालुक्यातील जोगलटेंभी येथील जेजूरकर वस्तीवर शनिवारी दुपारी शेतकरी कचेश्वर जेजूरक यांच्या शेतात पिंजरा लावण्यात आला होता. रात्री दहा वाजेच्या दरम्यान पिंजºयात ठेवलेल्या कोंबड्यांवर ताव मारण्याच्या नादात बिबट्या अडकला.ही बातमी परिसरात समजताच नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. गेल्या काही दिवसांपासून जोगलटेंभी, नायगाव, सोनगिरी आदी परिसरात हा बिबट्या मुक्त संचार करत होता. शनिवारी दुपारी भाऊसाहेब मानाजी कमोद हे शेतात पाणी देण्यासाठी गेले असता त्यांना उसाच्या शेतात बिबट्या दिसला.रात्रंदिवस परिसरात फिरणाºया बिबट्याने अनेक पाळीव जनावरांची शिकार केली होती. शिकार करताना बिबट्या अनेकदा सीसीटीव्हीत कैदही झाला होता. वन परिमंडल अधिकारी अनिल साळवे, राजाराम उगले, रमेश आवारी यांनी बिबट्याला मोहदरी वन उद्यानात आणले.

गेल्या काही दिवसांपासून जोगलटेंभी परिसरात दहशत निर्माण करणारा बिबट्या शनिवारी रात्री जेरबंद झाला. मुक्त संचार करणाºया बिबट्याने रात्रभर पिंजºयातून डरकाळ्या फोडत परिसरातील शेतकºयांची झोप उडविली होती. सुटका करून घेण्याच्या नादात पिंजºयातील तार व गजामुळे बिबट्याच्या तोंडाला गंभीर जखमा झाल्या आहेत.

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारforest departmentवनविभाग