शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात बिबट्यांचे हल्ले सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2018 00:19 IST

काकडगाव परिसरात शनिवारी (दि. २०) रात्री १२ वाजेच्या सुमारास पशुपालक संजय दगा अहिरे यांच्या वासरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.  काकडगावसह नामपूर परिसरात गत महिन्यापासून नर-मादी बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून, दिवसाढवळ्या अनेकदा नागरिकांना दर्शनही झाले आहे. परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. रात्री नर व मादी असे दोन बिबटे एकत्र फिरतात व दिवसा उसाच्या शेतात लपून बसतात. 

नामपूर : काकडगाव परिसरात शनिवारी (दि. २०) रात्री १२ वाजेच्या सुमारास पशुपालक संजय दगा अहिरे यांच्या वासरावर बिबट्याने प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली.  काकडगावसह नामपूर परिसरात गत महिन्यापासून नर-मादी बिबट्यांचा मुक्त संचार सुरू असून, दिवसाढवळ्या अनेकदा नागरिकांना दर्शनही झाले आहे. परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. रात्री नर व मादी असे दोन बिबटे एकत्र फिरतात व दिवसा उसाच्या शेतात लपून बसतात.   शनिवारी रात्री बिबट्याने संजय अहिरे यांच्या वासरावर हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वासराचा जीव वाचला असून, शरीरावर मोठ्या जखमा झाल्या आहेत. बिबट्याला पकडण्यासाठी काकडगावला लावण्यात आलेला पिंजरा केवळ शोभेचे बाहुले बनला आहे. बिबट्याला पकडण्यात वनविभागाला यश आले नसल्याने कर्मचारी जनतेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप काकडगावचे शेतकरी अजित अहिरे यांनी केला आहे. काकडगाव परिसरातील शेतकरी जोडव्यवसाय म्हणून पशुपालन करतात. त्यामुळे येथे शेळ्या, मेंढ्या, दुभती जनावरे, पोल्ट्री फार्मची संख्या मोठी आहे. परिसरात बिबट्याचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. वनविभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त न केल्यास वनखात्याला घेराव घालण्यात येईल, असा इशारा काकडगावचे सरपंच निंबा सोनवणे, राजाराम पाटील, अजित अहिरे, नंदलाल अहिरे, संदीप अहिरे, शिवाजी अहिरे, पप्पू अहिरे, संजय अहिरे, प्रभाकर अहिरे यांच्यासह शेतकºयांनी दिला आहे. मेंढपाळ धास्तावले; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निफाड : शुक्र वारी रात्री बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तालुक्यातील रु ई येथे शेळी ठार झाल्याची घटना घडली आहे. तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या  रु ई येथे भास्कर तासकर हे कोळगाव रोडलगत शेतात वस्ती करून राहतात. त्यांच्या घराच्या बाहेर शेळ्या बांधलेल्या होत्या. शुक्र वारी रात्रीच्या सुमारास यातील एका शेळीवर बिबट्याने हल्ला करून तिला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला होताच शेळ्यांच्या झालेल्या आरडाओरडीने तासकर कुटुंबाने तातडीने घराबाहेर बांधलेल्या शेळ्यांकडे धाव  घेतली. त्यानंतर बिबट्या पसार झाला. या शेळीला बांधलेल्या खुंट्याची दोरी न तुटल्याने बिबट्याला शेळीला ओढून नेता आले नाही. मात्र या हल्ल्यात शेळी ठार झाली. ही घटना तासकर यांनी वनविभागाला कळवली. घटना कळताच येवला वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी यांच्या आदेशान्वये वनरक्षक विजय टेकणर,  वनसेवक भय्या शेख, भारत माळी, पिंटू नेहरे  आदींचे पथक तासकर यांच्या शेतात दाखल झाले.  या पथकाने घटनेची माहिती घेतली. या घटनेचा पंचनामा केला. गुरु वारी रात्री बिबट्यांच्या हल्ल्यात खेडलेझुंगेला वासरी, ब्राह्मणवाड्याला म्हशीचा टोणगा, महाजनपूर येथे मेंढी व तिचे कोकरू असे एकूण चार पाळीव प्राणी ठार झाल्याची घटना घडली होती.

टॅग्स :leopardबिबट्याNashikनाशिक