पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळेपिंप्री येथे शनिवारी कळवण परिमंडळातील मौजे मार्कंडपिंप्री राखीव वनकक्ष क्रमांक २९७ वनपाल, वनरक्षक हे सदर जंगल भागात गस्त करीत असताना अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाचा बिबट्या (मादी) मृत अवस्थेत आढळला.सदर मृत बिबट्या मादीचा घटनास्थळी पंचनामा केला. त्यानंतर वसंत पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी कळवण, मोकभनगी येथील पशुधन विकास अधिकारी डॉ. विकास सातपुते व डॉ. महाले, एस. पी. हिरे वनपरिमंडळ अधिकारी कळवण, शशिकांत वाघ वनपरिमंडळ अधिकारी मोकभनगी, वनपरिमंडळ अधिकारी बागूल पाळेपिंप्री यांनी नाकोडा रोपवाटिकेत येऊन शवविच्छेदन केले. मृत बिबट्याचा मागील डावा पाय हा एक ते दीड वर्षांपासून अधू झालेला असावा. त्यामुळे त्याला शिकार करता येत नसल्याने या मादी बिबट्याच्या अन्ननलिकेत रक्त गोठल्याने व उपासमारीमुळे दोन दिवसांपूर्वीच बिबट्या मयत झाला असल्याचे डॉ. सातपुते व डॉ. महाले यांनी सांगितले. नंतर नियमानुसार कार्यवाही करून या मादी बिबट्यास अग्नीडाग दिला असून पुढील तपास चालू आहे.
पाळेपिंप्री येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:54 IST
पाळे खुर्द : कळवण तालुक्यातील पाळेपिंप्री येथे शनिवारी कळवण परिमंडळातील मौजे मार्कंडपिंप्री राखीव वनकक्ष क्रमांक २९७ वनपाल, वनरक्षक हे सदर जंगल भागात गस्त करीत असताना अंदाजे अडीच ते तीन वर्षे वयाचा बिबट्या (मादी) मृत अवस्थेत आढळला.
पाळेपिंप्री येथे मृत अवस्थेत आढळला बिबट्या
ठळक मुद्दे मृत बिबट्या मादीचा घटनास्थळी पंचनामा केला.