नाशिकरोड : नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदेगाव येथे तुंगार यांच्या मळ्यात लावलेल्या पिंजºयामध्ये मंगळवारी रात्री बिबट्या जेरबंद झाला.गेल्या एक-दीड महिन्यापासून ग्रामस्थांना वारंवार बिबट्याचे दर्शन झाल्याने संजय तुंगार यांच्या मळ्यात पंधरा दिवसांपूर्वी पिंजरा लावण्यात आला होता. मंगळवारी रात्री साडेसात वाजेच्या सुमारास बिबट्या पिंजºयात जेरबंद झाल्याचे लक्षात आले. पोलीस पाटील रवींद्र जाधव यांनी याबाबत वनविभागाला माहिती कळविली. वनरक्षक विजयसिंह पाटील, जे. पी. पंढुरे हे घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर एका वाहनातून पिंजºयामध्ये जेरबंद झालेल्या बिबट्याला घेऊन गेले. यावेळी बघ्यांची गर्दी उसळल्याने कामात अडथळा निर्माण झाला होता. शिंदेगाव परिसरामध्ये आणखीन एक बिबट्या असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
शिंदेगाव येथे बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 01:54 IST