शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

विहिरीतून बिबट्याने स्वत:हून केली सुटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:16 IST

बोरगावपासून काही अंतरावर असलेल्या बुबळी चिराई घाट परिसरातील एका विहिरीत बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास कोळला. बिबट्या आपला जीव वाचविण्यासाठी पहाटेपासून ...

बोरगावपासून काही अंतरावर असलेल्या बुबळी चिराई घाट परिसरातील एका विहिरीत बिबट्या मध्यरात्रीच्या सुमारास कोळला. बिबट्या आपला जीव वाचविण्यासाठी पहाटेपासून विहिरीत धडपड करत होता. विहिरीतून आपली सुटका कशी करता येईल, या प्रयत्नात तो पाण्यातच चकरा घालत डरकाळ्या फोडू लागला. त्याच्या डरकाळ्यांचा आवाज सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांच्या कानी पडला. यावेळी त्यांनी विहिरीच्या दिशेने धाव घेत आतमध्ये डोकावून बघितले असता बिबट्याची विहिरीत धडपड सुरू असल्याचे दिसले.

गावकऱ्यांनी तत्काळ वन विभागाच्या दक्षता पथकाला माहिती कळविली. काही वेळेतच सुरगाणा वनपरिक्षेत्रातील वनपाल, वनरक्षक घटनास्थळी दाखल झाले. विहिरीचा परिसर पूर्णपणे रिकामा करत बघ्यांची गर्दी वन कर्मचाऱ्यांनी दूर केली.

---इन्फो---

...अन‌् बिबट्याचा जीव वाचला

वन कर्मचाऱ्यांनी एक लाकडी शिडी विहिरीच्या कठड्यावरून आतमध्ये सोडली अन् शिडी दोरीच्या सहाय्याने भक्कम बांधून ठेवत तेथून काढता पाय घेतला.

बुद्धिमान वन्य प्राण्यांपैकी एक समजल्या जाणाऱ्या आणि कोणत्याही परिस्थतीशी त्वरित स्वत:ला जुळवून घेण्यात तरबेज असलेल्या या चपळ बिबट्याने ती शिडी अनेकदा पायाने हलवून तपासली. त्यानंतरच शिडीच्या लाकडी पायऱ्यांवर पाय टाकून वर येण्यास सुरुवात केली. अखेर काही वेळेतच बिबट्याने विहिरीतून सुखरूपपणे बाहेर आला. काही मिनिटे कठड्यावर बसत भिजलेले शरीर झटकत जंगलाच्या दिशेने झेप घेत पलायन केले.

---

फोटो आर वर : ०९बिबट्या१/२ नावाने सेव्ह.

===Photopath===

090321\09nsk_34_09032021_13.jpg~090321\09nsk_35_09032021_13.jpg

===Caption===

विहिरीतून बाहेर पडताना बिबट्या~विहिरीतून बाहेर पडताना बिबट्या