शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

दारणाकाठी ऊसात आढळले बिबट्याचे बछडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 01:25 IST

दारणा नदीकाठालगतच्या मौजे वडनेर शिवारातील पोरजे यांच्या ऊस शेतीत आश्रयास असलेल्या बिबट्याच्या मादीने आठवडाभरापूर्वी जन्म दिलेल्या बछड्यांपैकी दोन बछडे बुधवारी (दि.२६) संध्याकाळी आढळून आले.

नाशिक : दारणा नदीकाठालगतच्या मौजे वडनेर शिवारातील पोरजे यांच्या ऊस शेतीत आश्रयास असलेल्या बिबट्याच्या मादीने आठवडाभरापूर्वी जन्म दिलेल्या बछड्यांपैकी दोन बछडे बुधवारी (दि.२६) संध्याकाळी आढळून आले.भक्ष्याच्या शोधात बाहेर पडल्यानंतर असुरक्षिततेची जाणीव झाल्याने मादी-नवजात बछड्यांची ताटातूट झाली असावी, असा अंदाज वनविभागाने वर्तविला आहे. नाशिक पश्चिमच्या हद्दीत भगूरजवळील वडनेर येथील पोरजे यांच्या शेतमळ्यात बुधवारी दुपारी ऊस कापणी पूर्ण करण्यात आली. यावेळी उसाच्या चिपाडाखाली बिबट्यांचे दोन बछडे ऊसतोड कामगारांना नजरेस पडले. त्यांनी तत्काळ ही बाब शेती मालकाला सांगितली. पोरजे यांनी वनविभागाला माहिती कळविली. तत्काळ वनक्षेत्रपाल विवेक भदाणे, वनपाल अनिल अहिरराव, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले यांनी घटनास्थळी धाव घेतली. बछड्यांची पाहणी करुन ते उपाशीपोटी तर नाही ना याचा अंदाज लावण्यात आला. ते सुदृढ असल्याची खात्री पटल्यानंतर पुन्हा जैसे थे पद्धतीने बछड्यांना शेतात सुरक्षित ठेवण्यात आले. तसेच मानव-बिबट्या संघर्ष टाळण्यासाठी ऊस शेतीचा संपूर्ण परिसर वनाधिकारी कर्मचाऱ्यांनी निर्मनुष्य केला. तसेच संध्याकाळनंतर कोणीही या भागात घराबाहेर पडू नये, आपली लहान मुले, पाळीव प्राण्यांना सुरक्षितपणे बंदिस्त जागेत ठेवण्याचे आवाहन  करण्यात आले.अंधार पडल्यापासून बराचवेळ मादी बिबट बछड्याच्या जवळपास आल्याचे कॅमेऱ्यात दिसलेले नव्हते. या ठिकाणी ३६० अंशात फिरणारा डिजिटल कॅमेरा बसविण्यात आला आहे. कॅमेऱ्याच्या माध्यमातून हालचालींवर रात्रभर वनकर्मचारी लक्ष ठेवून होते. 

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या