शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याचा भरदुपारी शेतात युवकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 00:45 IST

इगतपुरी : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा भरदुपारी शेतात पाहणी करत असलेल्या युवकावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

ठळक मुद्देसलग दुसऱ्या दिवशीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण

इगतपुरी : तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी बिबट्याचा भरदुपारी शेतात पाहणी करत असलेल्या युवकावर हल्ला झाल्याच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.इगतपुरी तालुक्यातील खेड परिसरात शनिवारी (दि.१३) रात्री बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच व वनविभागाने या परिसरात चार पिंजरे लावले असताना देखील रविवारी (दि.१४) भरदुपारी घोडेवाडी येथील पंढरी घोडे या ३७ वर्षीय तरुणावर त्याच्या घरासमोर असलेल्या शेतात गव्हाची पाहणी करत असताना पिकात दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवला. त्याने प्रसंगावधान राखत प्रतिकार करून आरडाओरड केल्याने बिबट्याने धूम ठोकली.यात युवकाच्या पाठीला हातावर व दंडावर बिबट्याने चावा घेतला आहे. दरम्यान काही लोकांनी डोंगरावरील वाळलेल्या गवतास पेटवून दिल्याने आपला जीव वाचविण्यासाठी हे प्राणी मानवी वस्तीचा रस्ता धरत असून गावात कोल्हे, तरस इत्यादी प्राण्याचे सध्या दर्शन घडत असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात येते. मात्र अशा परिस्थितीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. 

टॅग्स :leopardबिबट्याFarmerशेतकरी