शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वटारला बिबट्याचा वृद्धेवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 00:49 IST

वटार : येथील तळवाडेरोडलगत सोमवारी सायंकाळी ६:४५ वाजेच्या सुमारास अंगणात बसलेल्या वृद्ध महिलेवर भक्ष्याच्या शोधात असलेला बिबट्याने हल्ला चढवत डोक्याला पंजा मारून जखमी केले. महिलेने आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून पळ काढला व महिलेचे प्राण वाचले. तत्काळ या महिलेला सटाणा आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

ठळक मुद्दे वनविभाग सुस्त : ग्रामस्थ भयभीत; पशुधन धोक्यात

गेल्या महिन्यापासून बिबट्याने धुमाकूळ घातला असून, दररोज शेतकऱ्यांच्या दुभत्या जनावरांवर ताव मारत आहे. दररोजच सायंकाळपासूनच कोणत्या ना कोणत्या शेतकऱ्याला बिबट्या दर्शन देतो. पुन्हा एकदा ग्रामस्थ भयभीत झाले असून, पशुधनही धोक्यात आले आहे. दरवर्षी या परिसरात बिबट्याच्या वावर असतो, येथील शेतकरी पशुपालन करणारा असून. दुभती जनावरेही मोठ्या प्रमाणात आहेत. बिबट्याचे सतत दर्शन होत असल्याने शेतकरी धास्तावला आहे.गेल्या सहा महिन्यांत बिबट्याने सहा ते सात वेळा हल्ले करून २० ते २५ निष्पाप मुक्या प्राण्यांचा बळी गेला. अनेक दिवसांपासून सावतावाड शिवारात बिबट्याचा वावर आहे. उडवाउडवीचे उत्तर देऊन वनपाल आपल्या अंगावरचे काम झटकत असतात. मेंढपाळ तर जेरीस आले असून, दरवर्षी १० ते १२ मेंढ्या बळी द्याव्या लागत आहेत. येथील शेतकरी पशुपालन करणारा असून, दुग्ध व्यवसायही शेतीला जोडधंदा म्हणून करतो. परिसरात बिबट्याच्या वावर असल्यामुळे रात्रही जागून काढावी लागत आहे, मेंढपाळ फटाके फोडून पाळीव प्राण्यांचे संरक्षण करत आहेत.बऱ्याच दिवसांपासून आम्हाला शेतात बिबटे मोकळे दिसतात. जनावरांना चारा कापण्यासाठी शेतात जाता येत नाही. आज अनेक संकटांना तोंड देऊन शेती व्यवसाय सुरळीत ठेवली आहे. त्यात अशी हानी होत राहिली तर आम्ही काय करायचे, आज माझ्या आईवरती हे संकट आले, उद्या कोणावरही येऊ शकते त्यामुळे वनविभागाने तातडीच्या उपाययोजना कराव्यात.- कारभारी पवार, शेतमजूर, वटार

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या