शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यासमोरच बिबट्याचा शेळीवर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 00:32 IST

सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत बिबट्याने शेळीवर ...

ठळक मुद्देविंचुरीदळवी : नागरिकांमध्ये घबराट, वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी

सिन्नर: तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील गावांमध्ये पुन्हा बिबट्याची दहशत निर्माण झाली आहे. दुपारी ४ वाजताच्या सुमारास शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत बिबट्याने शेळीवर हल्ला करून ठार केले. त्यामुळे पशुपालक व शेतकऱ्यांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली आहे.दारणा नदीच्या किनारी वाकी परिसरात रघुनाथ फकिरा पवार शेळ्या चारण्यासाठी गेलेले होते. त्यांच्याबरोबर दोन लहान मुलेही होती. दुपारी चारच्या सुमारास शेळ्या चारून घरी परतण्याच्या तयारीत असताना गणपत दळवी यांच्या शेताच्या कडेला दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक पवार यांच्या शेळीवर हल्ला केला. हा प्रकार पवार यांच्या लक्षात येताच त्यांनी आरडाओरडा केला व बिबट्याच्या जबड्यातून शेळीची सुटका केली.

मात्र तोपर्यंत शेळी ठार झालेली होती. सोबत असलेल्या चिमुकल्यांवरच जर बिबट्याने हल्ला केला असता तर मोठा अनर्थ घडला असता, या कल्पनेने पवार यांचा थरकाप उडाला. शेळीपालन हेच त्यांचे एकमेव उत्पनाचे साधन असल्याने त्यातही बिबट्याची दशहत निर्माण झाल्यामुळे पशुपालक भीतीच्या सावटाखाली आहे. पवार यांचे जवळजवळ १५ हजारांचे नुकसान झाले आहे. त्यांना त्वरित वन विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.गेल्या काही महिन्यात वारंवार बिबट्याचा हल्ला आणि दर्शन अशा घटनांनी परिसरात भीतीचे वातावरण पसलेले आहे. महिना-दीड महिन्यापूर्वी पिकांच्या राखणीसाठी शेतातील घरी झोपण्यासाठी गेलेल्या वृध्दावर बिबट्याने हल्ला करुन ठार केल्याची थरकाप उडविणारी घटना घडली होती. त्यानंतर परिसरातील द्राक्ष उत्पादकाच्या शेतात बिबट्या दडून बसला होता. वस्त्यांवर राहणाऱ्या शेतकऱ्यांना घराबाहेर पडणाऱ्या लहान मुलांवर सातत्याने लक्ष ठेवावे लागत आहे.बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणीघटनेनंतर वनपाल पी. के. आगळे, वनरक्षक के. डी. सदगीर घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला. बिबट्या दिवसाढवळ्या दर्शन देत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत. पाळीव प्राण्यांवरसुद्धा बिबट्या वारंवार हल्ले करत आहे. कधीकधी बिबट्या मानवी वस्तीकडेसुद्धा शेतक-यांना दिसतो. वन विभागाने त्वरित बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

टॅग्स :leopardबिबट्याforest departmentवनविभाग