शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

भरदिवसाच बिबट्याचा युवकावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 00:27 IST

सिन्नर: तालुक्यातील दापूर येथे शेतात मक्याला पाणी भरणाऱ्या युवकावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. युवकाच्या मोठ्या भावाने व वडिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने मक्याच्या शेतात पळ काढला व युवकाचे प्राण वाचले.

ठळक मुद्दे दापूर: जिल्हा रुग्णालयात हलविले

तेलमाथा भागात राहणाऱ्या सुधाकर आव्हाड यांची बेलगया मळ्यात शेतजमीन आहे. या शेतात आव्हाड यांनी मक्याचे पीक घेतले आहे. आव्हाड यांची मुले मंगेश आणि भगवान हे दोघे वडिलांसह मंगळवारी सकाळी शेतातील मक्याला पाणी भरत होते. सकाळी दहा वाजेच्या सुमारास तहान लागल्याने मंगेश व भगवान हे शेततळ्याजवळ पाण्याची बाटली घेण्यासाठी गेले. पाणी पिऊन दोघे मक्याकडे येत असतांना बिबट्याने अचानक मंगेश (२३) याच्यावर हल्ला केला. जवळ १० ते १५ फुटावर असलेल्या भगवान याने आरडाओरडा केल्यानंतर शेतात असलेल्या वडिलांनी पळत येत आरडाओरडा केल्यानंतर बिबट्या मक्याच्या शेतात पळून गेला.या हल्ल्यात मंगेशच्या छाती, कान, गाल, डाव्या हाताला जखमा झाल्या. भाऊ व वडिलांनी जखमी मंगेशला दुचाकीवर तातडीने दापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेले. जखमा गंभीर असल्याने मंगेश यास सिन्नर नगरपरिषदेच्या रुग्णालयात आणण्यात आले. त्यानंतर अधिक उपचारासाठी नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. घटनेची माहिती वनविभागाला दिल्यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण सोनवणे, किरण गोर्डे, वनपाल दीपक तुपलोंढे यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पिंजरा लावल्याची माहिती वनविभागाने दिली.

टॅग्स :Nashikनाशिकleopardबिबट्या