नाशिक : रोजगार हमी योजनेंतर्गत जंगलाच्या रक्षणासाठी सुरक्षारक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या रोजंदारी वनकर्मचाऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना बुधवारी (दि़ ७) दुपारच्या सुमारास दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे जंगलात घडली़ जखमी कर्मचाऱ्याचे नाव रामदास जयराम वटाणे (३५, रा.़ कोशिंबे) असे असून, त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ दिंडोरी तालुक्यातील कोशिंबे येथे २५ हेक्टरचा जंगल परिसर असून, जंगलाच्या रक्षणासाठी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांबरोबरच रोजगार हमी योजनेतील दोन कर्मचाऱ्यांची सुरक्षारक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे़ बुधवारी दुपारच्या सुमारास सुरक्षारक्षक रामदास वटाणे नव्याने लावलेल्या रोपांची पाहणी करण्याकरिता गेले असता गवतात लपलेल्या बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला़ यामध्ये त्यांच्या एका पायाला व पाठीवर जखमा झाल्या आहेत़ सुरक्षारक्षक वटाणे जखमी झाल्याची माहिती मिळताच वनपरीक्षेत्राचे रेंजर किरण भांगरे हे तत्काळ घटनास्थळी पोहोचले़ (प्रतिनिधी)
कोशिंबे वनपरीक्षेत्रातील सुरक्षारक्षकावर बिबट्याचा हल्ला
By admin | Updated: September 8, 2016 01:03 IST