कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या दात्याणे येथील धनवटे वस्तीवर नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. निफाड तालुक्यातील दात्याणे, थेरगाव, ओणे, खेरवाडी, सुकेणे, चांदोरी शिवारात गेल्या आठ दिवसांपासून दहशत पसरविणारा पाचवर्षीय बिबट्या गुरुवारी मध्यरात्री दात्याणे येथील एकनाथ पंढरीनाथ धनवटे यांच्या शेतात लावलेल्या पिंजऱ्यात कैद झाला.गेल्या आठ दिवसांपासून या भागात या बिबट्याच्या संचार होता. काही दिवसांपूर्वी हुजरे वस्तीवरील गायीचे वासरू आणि कुत्रे त्याने फस्त केले होते. त्यामुळे या भागात बिबट्याला मुले घाबरत होती; परंतु गुरुवारी पहाटे एकनाथ धनवटे यांनी बिबट्या पिंजºयात कैद झाला असल्याचे पाहिले. निफाड वन विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या पथकाने या बिबट्यास ताब्यात घेतले आहे.
दात्याणेत बिबट्या जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2018 00:34 IST
कसबे सुकेणे : येथून जवळच असलेल्या दात्याणे येथील धनवटे वस्तीवर नर बिबट्या जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे.
दात्याणेत बिबट्या जेरबंद
ठळक मुद्दे गेल्या आठ दिवसांपासून दहशत