शहरं
Join us  
Trending Stories
1
काळजी घ्या! देशात कोरोनाचे रुग्ण ३ हजारांवर, कर्नाटक, महाराष्ट्रातही रुग्णसंख्या वाढली
2
थायलंडच्या या सुंदरीने जिंकली ७२ वी मिस वर्ल्ड स्पर्धा; नंदिनी गुप्ता टॉप 8 मधून बाहेर पडली
3
Pune Car Accident : अनाचक चालकाचे नियंत्रण सुटले, समोर असलेल्या चहाच्या टपरीवर कार घुसली; अपघाताचा व्हिडीओ आला समोर
4
Pune Car Accident : 'चहा घ्यायला थांबलाे अन् पाय गमावून बसलाे'! तरुणाने सांगितली आपबीती
5
Pune Car Accident : पुण्यात कारने १२ जणांना उडवले, अपघातामधील जखमींची यादी आली समोर
6
Pune Car Accident : पुण्यातील कार अपघातातील चालकाची मोठी चूक; धक्कादायक माहिती आली समोर
7
MI ला नशिबाची एवढी साथ कशी मिळते? २०१८ च्या हंगामात तर... नेमकं काय म्हणाला आर. अश्विन?
8
Pune Accident: टपरीवर चहा पिणाऱ्या १२ विद्यार्थ्यांना भरधाव कारने उडवले; पुण्याच्या सदाशिव पेठेतील घटना
9
शासकीय नोकरी करणाऱ्या लाडक्या बहिणी सरकारच्या रडारवर; बावनकुळेंनी दिला कारवाईचा इशारा
10
टीम इंडियाकडून खेळणाऱ्या या गड्याला कोहलीची आयकॉनिक १८ क्रमांकाची जर्सी कशी काय मिळाली?
11
'नेपाळी तिथे जाऊ शकतात, भारत तुम्हाला जामीनही देणार नाही'; चीनने नागरिकांना इशारा का दिला?
12
सायरन वाजला, स्ट्रेचरवर लोकांना आरोग्य कर्मचारी घेऊन जाऊ लागले; पाकिस्तानच्या सीमेजवळ असलेल्या राज्यांमध्ये मॉक ड्रिल
13
तिघांची एकत्र चौकशी करायची आहे; निलेशसहीत सासरा, दीर यांनाही ३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
14
साताऱ्यात कोरोनाचा पहिला बळी रुग्ण संख्या तीनवर; नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन
15
'आम्ही त्यांना बोलावले नाही, शाहिद आफ्रिदी अन् उमर गुल स्वतःहून आले'; आयोजकांनी मागितली माफी
16
IPL 2025 Orange Cap Race : जे विराटला जमणार नाही ते सूर्याला सहज शक्य होईल, पण...
17
मामाच्या नावाने हगवणेंनी स्वतःचे खिसे भरले; कस्पटेंकडून रुखवतासाठी १ लाखांचा चेक अन् ५० हजार घेतले
18
Shubman Gill: हार्दिकसोबत मतभेद झाल्याच्या चर्चांवर गिलने सोडले मौन; इंस्टाग्राम स्टोरीमध्ये लिहिले...
19
IPL Qualifier 2: आतापर्यंत फक्त ४ फलंदाजांनी साधलाय 'शतकी' डाव!
20
बापरे! मॅरेज ब्युरो चालवणाऱ्या महिलेने क्लाएंटसोबत लावलं स्वत:च्या नवऱ्याचं लग्न, घेतले ७ लाख

कायदेविषयक साक्षरता शिबिर

By admin | Updated: July 23, 2014 00:26 IST

कायदेविषयक साक्षरता शिबिर

मालेगाव : येथील अप्पर जिल्हा व सत्र न्यायालयात मालेगाव तालुका विधी सेवा समिती व मालेगाव वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक साक्षरता व मार्गदर्शन शिबिर झाले. अध्यक्षस्थानी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा जिल्हा न्यायाधीश सी. डब्ल्यू. सैंदाणी होते.अध्यक्षपदावरून बोलताना न्यायाधीश सैंदाणी यांनी कायद्याने दिलेल्या हक्क व अधिकारांची योग्य ती जपणूक करण्याचे आवाहन केले. युनियन बॅँक आॅफ इंडिया मालेगाव शाखेचे व्यवस्थापक मनीषकुमार यांनी मायक्रो फायनान्स स्कीम याबाबत मार्गदर्शन केले. त्यात त्यांनी केंद्र व राज्य सरकार यांच्या लघु उद्योगांकरिता असलेल्या चांगल्या योजनांविषयीची माहिती दिली. अ‍ॅड. किशोर त्रिभुवन यांनी अनुसूचित जाती जमाती-अधिकार व त्यासंबंधीचे कायदे याविषयी मार्गदर्शन केले. या कायद्याचा लाभ घेतानाच या कायद्याचा दुरूपयोग होणार नाही याविषयी काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. सहदिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पी.पी. अभंग यांनी नागरी हक्क संरक्षण कायद्याची माहिती दिली. सहदिवाणी न्यायाधीश पी.सी. काळे यांनी अपंग लोकांसाठी असलेल्या विविध कायद्यांची माहिती दिली. अ‍ॅड. बी. एल. लोखंडे यांनी विकलांग व अपंगांना भेडसावणाऱ्या विविध समस्या व त्यांना शासनस्तरावर असलेल्या अनेकविध सोयी सुविधांबाबत मार्गदर्शन केले. प्रास्ताविक मालेगाव वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सुधाकर निकम यांनी केले. यावेळी वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश एस. आर. जैसवाल, सहदिवाणी न्यायाधीश एस. एन. कठारे, व्ही. आर. अग्रवाल, एम.पी. भावसार, ए. एच. बेग, सी.पी. रघुवंशी, ए.आर. कल्हापुुरे, के.बी.एच. विधी महाविद्यालयाचे उपप्राचार्य व्ही. व्ही. अहिवले यांच्यासह मालेगाव वकील संघाचे सर्व पदाधिकारी, वकील व पक्षकार आदि उपस्थित होते. सूत्रसंचालन वकील संघाचे सचिव अ‍ॅड. चंद्रशेखर शेवाळे यांनी केले.