शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेचा आज फैसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2018 01:04 IST

नाशिक : नाट्यमय घडामोडी आणि राजकीय उलथापालथीने गाजलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) मतदान होणार असून, राष्टÑवादीचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे याचबरोबर जिल्हा बॅँकेचे संचालक अपक्ष परवेज कोकणी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आयोगाने करडी नजर ठेवली असून, सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे.

ठळक मुद्देतिरंगी लढतीत प्रतिष्ठा पणाला मतदान तयारी पूर्ण

नाशिक : नाट्यमय घडामोडी आणि राजकीय उलथापालथीने गाजलेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी सोमवारी (दि.२१) मतदान होणार असून, राष्टÑवादीचे अ‍ॅड. शिवाजी सहाणे आणि शिवसेनेचे नरेंद्र दराडे याचबरोबर जिल्हा बॅँकेचे संचालक अपक्ष परवेज कोकणी यांच्यात तिरंगी लढत होत आहे. निवडणुकीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाली आहे. आयोगाने करडी नजर ठेवली असून, सीसीटीव्हीचा वॉच असणार आहे.महापालिका आणि नगरपालिकांचे नगरसेवक तसेच पंचायत समितीचे सभापती तसेच जिल्हा परिषद सदस्य मतदार असलेल्या या निवडणुकीसाठी पंधरा मतदान केंद्रे आहेत. मतपत्रिकांवर पसंतीक्रमानुसार मतदान देण्याची पद्धत असल्याने त्यासंदर्भात विशेष दक्षता घेऊन मतदार याद्या केंद्रांवर पोहोचवण्यात आल्या आहेत. रविवारी (दि.२१) सुटी असतानाही जिल्हाधिकारी कार्यालय गजबजले होते. मतदान केंद्र अधिकाऱ्यांची बैठक जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी मतदानाच्या प्रक्रियेची नियमावली व अन्य बाबतीत मार्गदर्शन केले. मतदान पंधराही मतदान केंद्रांवर सकाळी ८ ते दुपारी ४ वाजता होईल. या निवडणुकीसाठी मतदान केंद्रांवर व्हिडीओग्राफर नियुक्त करण्यात आले असून, गोपनीयतेचा भंग होऊ नये यासाठी मायक्रो आॅब्जरवर नियुक्त करण्यात आले आहेत. या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी (दि.२४) जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.ओळखपत्र आवश्यकया निवडणुकीत मतदानासाठी ओळखपत्र आवश्यक असून, पुरावे असल्यासच मतदान करता येणार आहे.