शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

डाव्या कालव्यावरील पूल कोसळला

By admin | Updated: August 7, 2014 01:40 IST

डाव्या कालव्यावरील पूल कोसळला

नाशिक : जलालपूर शिवारातून मुंगसरा फाट्याकडे जाण्यासाठी गंगापूर धरणाच्या डाव्या कालव्यावर असलेला दगडी पूल गेल्या शुक्रवारी कोसळल्याने जलालपूर-मुंगसरा ग्रामस्थांचा संपर्क तुटला आहे. सदर पूल बांधण्याची मागणी ग्रामस्थांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे, डाव्या कालव्यावर असलेला जुना दगडी पूल गेल्या शुक्रवारी (दि. १ आॅगस्ट) सकाळी पावसामुळे कोसळला. पूल जुना असल्याने त्याची दुर्दशा झालेली होती. या पुलावरून जलालपूर शिवारातील शेतकरी, शाळकरी विद्यार्थी मुंगसरा फाट्याकडे रोज ये-जा करतात, तसेच मुंगसरा फाट्याकडील शेतकऱ्यांची शेतमालाची वाहनेही ये-जा करत असतात. ग्रामस्थांना हाच एकमेव पूल दळणवळणासाठी उपलब्ध आहे. आता पूल कोसळल्याने आणि शेतकऱ्यांना जलालपूर शिवार ते मुंगसरा फाट्याकडे जाण्यासाठी पर्यायी रस्ता नसल्याने शेतमाल नाशिकला नेण्यात अडथळे उत्पन्न होत आहेत. त्यामुळे शेतमाल पडून राहत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. पावसामुळे सध्या कालव्यातून पाणी वाहत असते. त्यामुळे या रस्त्यावरून शाळकरी मुलांना मार्गक्रमण करणे धोकादायक बनले आहे. रात्रीच्या वेळी याठिकाणी अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ग्रामस्थांचा संपर्क तुटल्याने कामे ठप्प झाली आहेत. पाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांनी तत्काळ या पुलाची प्रत्यक्ष पाहणी करून रस्ता पूर्ववत करण्यासाठी लवकरात लवकर पुलाच्या बांधकामाला सुरुवात करावी, अशी मागणी जलालपूरचे सरपंच रमेश डंबाळे, सोमनाथ निंबारे, शांताराम निंबारे, निवृत्ती जगताप, सुरेश जगताप, भोलेनाथ भागरे, मधुकर भडिंगे, अशोक कडाळे, बबाजी ढोणे आदि ग्रामस्थांनी केली आहे. (प्रतिनिधी)