शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक महापालिका शासन नियुक्त कंपनीमार्फतच एलईडी फिटींग्ज बसवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2018 14:12 IST

आयुक्तांचे स्पष्टीकरण : प्रशासनाचा प्रस्ताव विजबिल बचतीसाठीच

ठळक मुद्देज्या नगरसेवकांनी एलईडी दिव्यांसाठी आपल्या निधीतून प्रस्ताव दिले होते, त्यांना त्यांचा निधी अन्य कामांसाठी वर्ग करता येईलमहापालिका आयुक्तांनी नगरसेवक निधीतून बसविण्यात येणा-या सर्व एलईडी फिटीग्जच्या प्रस्तावांना थांबविले आहे

नाशिक - एलईडी दिव्यांची खरेदी ही शासननियुक्त एनर्जी इफिशियन्सी सर्व्हिस लिमिटेड (ई-ई-एस.एल.) या कंपनीकडूनच होणार असून प्रशासनाने विजबिल बचतीसाठीच महासभेवर प्रस्ताव सादर केला होता, असे स्पष्टीकरण महापालिका आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी दिले आहेत. दरम्यान, ज्या नगरसेवकांनी एलईडी दिव्यांसाठी आपल्या निधीतून प्रस्ताव दिले होते, त्यांना त्यांचा निधी अन्य कामांसाठी वर्ग करता येईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.संपूर्ण राज्यात यापुढे एलईडी दिव्यांची फिटींग्ज ही शासननियुक्त ई-ई-एस.एल या कंपनीमार्फतच करण्याचे आदेश राज्य शासनाने महापालिकांना दिले आहेत. या आदेशापूर्वीच महापालिका प्रशासनाने महासभेवर प्रस्ताव सादर करत त्यात ई-ई-एस.एल अथवा ई-निविदा प्रक्रिया राबवून एकाच कंपनीला फिटींग्ज बसविण्याचे काम देण्याचे नमूद केले होते. सदरच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरीही दिलेली आहे. मात्र, अद्याप सदरचा ठराव प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. शासनाने ई-ई-एस.एल या कंपनीकडूनच एलईडी फिटींग्ज बसविण्याचे आदेश काढल्याने महापालिका आयुक्तांनी नगरसेवक निधीतून बसविण्यात येणा-या सर्व एलईडी फिटीग्जच्या प्रस्तावांना थांबविले आहे. त्याबाबत आयुक्त अभिषेक कृष्ण यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. शासननियुक्त ई-ई-एस.एल कंपनीकडूनच एलईडी फिटींग्ज बसविण्यात येणार आहेत. एकाच कंपनीला जोपर्यंत संपूर्ण शहराचे काम दिले जात नाही तोपर्यंत वीजबिलात कशाप्रकारे बचत होते आहे, याचा उलगडा होणार नाही. शहरात स्मार्ट लायटिंग प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यातून कोणत्या वेळी दिव्यांचा प्रकाश कसा असावा, त्यातून किती विज बचत होते, हे निश्चित होणार आहे. नगरसेवकांनीही आपल्या निधीतून एलईडी फिटींग्ज बसविण्याचे प्रस्ताव दिले आहेत परंतु, ज्यांनी असे प्रस्ताव दिले आहेत त्यांना आपला निधी अन्य कामांसाठी सुचविता येऊ शकेल. त्याबाबत काही नगरसेवकांनी आपली भेट घेऊन तशी पत्रेही दिल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले.महासभेच्या ठरावाकडे लक्षप्रशासनाने पथदीपांच्या विजबिल बचतीसाठी स्मार्ट लायटिंगचा प्रस्ताव मागील महासभेत ठेवला होता. सदर प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिलेली आहे. मात्र, अद्याप महासभेचा ठराव प्रशासनाला प्राप्त झालेला नाही. महासभेचा ठराव नेमका काय आहे, यावर स्मार्ट लायटिंगचा प्रकल्प निर्भर असल्याचेही आयुक्तांनी म्हटले आहे. त्यामुळे महासभेच्या ठरावाकडे लक्ष लागून आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिका