शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
5
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
6
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
8
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
9
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
10
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
11
महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांचा फोटो काढून जिंकू शकता ५ लाख ! कुठे करायचा अपलोड, काय आहे योजना?
12
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
13
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
14
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
15
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
16
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
17
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
18
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
19
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
20
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?

व्याख्यान, मेळावा : कृषी साहित्य, गृहोपयोगी वस्तूंच्या स्टॉलवर गर्दी कृषी महोत्सवास नाशिककरांचा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 01:07 IST

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला.

ठळक मुद्दे गृहोपयोगी वस्तूंना मागणी असल्याचे दिसून आलेऔषध, गोळ्या यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी

नाशिक : अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या वतीने डोंगरे वसतिगृह मैदानावर सुरू झालेल्या जागतिक कृषी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशीही नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळाला. प्रदर्शनस्थळी थाटलेल्या कृषी साहित्य, गृहोपयोगी वस्तूंना मागणी असल्याचे दिसून आले.आबासाहेब मोरे, विभागीय धर्मादाय आयुक्त प्रदीप घुले, राजेश खिंवसरा, भास्कर बेहरे यांच्या उपस्थितीत कार्यक्रमास प्रारंभ झाला. इलेक्ट्रिक रिक्षा, बाइक आदी वाहाने, अ‍ॅग्री ड्रोन कॅमेरा, ३०० पेक्षा जास्त दुर्मिळ वनस्पती, सोलर उत्पादने, शिंपी, सोनार, लोहार यांच्याकडे मिळणारी अवजारे, वस्तू लक्ष वेधत आहे. कृषी पर्यटन, जोड व्यवसाय, शासनाच्या शेतकºयांसाठी योजना, बारा बलुतेदार, कृषी क्षेत्रातील पारंपरिक अवजारे यांचे दर्शन घडवणारे गावाचे जिवंत मॉडेल, दुर्गसंवर्धनासाठी प्रबोधनपर देखावा, पारंपरिक खेळ, क्रीडा व कौशल्य मांडणी (१४ विद्या, ६४ कला आदी), कुस्ती आखाडा, बैठे खेळ, मोय, बैलगाडी, नांगर, औत, ट्रॅक्टर, गावचा बाजार, जत्रा, मंदिरे, पारंपरिक सण, उत्सव, आदर्श गोशाळा, पशुपालन, आदर्श विवाह सोहळा आदींचे देखावे साकारण्यात आले आहे. याशिवाय कृषी संस्कृती दर्शन, पशुधन व गोवंश प्रदर्शन, देशी बी-बियाणे प्रदर्शन मांडण्यात आले आहे. दुर्मिळ व औषधी वनस्पती, त्यांचे काढे, औषध, गोळ्या यांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी दिसून येत आहे. दुपारी ‘देशी बी-बियाणे काळाची गरज’ हे चर्चासत्र रंगले. या चर्चासत्रात देशी बियाणांचे महत्त्व, त्यांचे जतन करण्याच्या पद्धती, त्यांची उपयुक्तता, त्याचे उत्पादन, होणारा फायदा, घ्यावयाची काळजी आदी पैलूंवर सविस्तर चर्चा झाली. सायंकाळी कृषी सांस्कृतिक व समाज प्रबोधनपर कार्यक्रमांची रेलचेल पहायला मिळाली. प्रदर्शनासाठी मोफत प्रवेश असून, रविवारपर्यंत ते चालणार आहे.विक्रमी संख्येचा वधूवर मेळावामहोत्सवाअंतर्गत आयोजित वधूवर मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यावेळी विवाहेच्छुक वधूवर व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहर, जिल्हा व राज्यस्तरातून जवळपास २५०० इच्छुक यात सहभागी झाले होते. सेवामार्गाअंतर्गत विवाह नोंदणीत उपलब्ध असलेली व प्रदर्शनस्थळी नव्याने झालेल्या स्थळांच्या नोंदणीची माहिती यावेळी सर्व उपस्थितांना देण्यात आली. या मेळाव्याच्या माध्यमातून भविष्यकाळात जे विवाह जमणार आहेत ते गुरूपीठावर सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत होणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. नाशिकच्या धर्मादाय आयुक्तांच्या पुढाकाराने आत्महत्याग्रस्त व गरीब शेतकºयांच्या मुला-मुलींचे विवाह धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या व सेवाभावी धार्मिक संस्थांच्या मदतीने होणार आहे. या उपक्रमासाठी सेवामार्ग व कृषी महोत्सवाच्या वतीने ५१००० रपयांचा धनादेश धर्मादाय आयुक्त प्रदीप घुले यांना आबासाहेब मोरे यांच्या हस्ते देण्यात आला.