शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान चाचणी करायला गेला...! आपल्याच मिसाईलपासून थोडक्यात वाचला, अणु केंद्राजवळ कोसळली
2
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
3
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
4
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
5
सीक्रेट मैत्री! 'या' इस्लामिक राष्ट्रानं भारताशी साधली जवळीक; पाकिस्तानसह तुर्कीलाही मोठा धक्का
6
टॅरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
7
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
8
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
9
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
10
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
11
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
12
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
13
Deep Amavasya 2025: दीप पूजन शास्त्रोक्त विधीने कसे करावे आणि दिव्यांची कोणती आरती म्हणावी जाणून घ्या
14
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
15
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
16
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
17
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
18
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
19
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
20
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...

माणूस ओळखायला शिकावे : तुळशीराम गुट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 00:13 IST

स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले. सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

नायगाव : स्वत:भोवती जास्त माणसे जमवण्यापेक्षा माणसातला माणूस ओळखायला शिकणे म्हणजे मोठेपणाचे लक्षण असल्याचे सांगून दिघोळे यांनी विकासाबरोबर माणुसकीही जपल्याचे प्रतिपादन सिद्धी मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष तुळशीराम गुट्टे महाराज यांनी केले.सिन्नर तालुक्यातील वडझिरे येथील परिसर ग्रामविकास समितीच्या २१ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या जीवनगौरव समारंभात माजी मंत्री तुकाराम दिघोळे बोलत होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते दिघोळे यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडाजीमामा आव्हाड, सहचिटणीस हेमंत धात्रक, प्रकाश घुगे, संचालक हेमंत नाईक, गोदा युनियनचे अध्यक्ष लक्ष्मण सांगळे, चिंचोलीचे माजी सरपंच संजय सानप, विलास सांगळे, निवृत्त पोलीस अधिकारी भीमराव दराडे, पांडुरंग बोडके व्यासपीठावर उपस्थित होते.  सुमारे सातशे वर्षांपूर्वी संत ज्ञानेश्वरांनी सांगितलेले जलसंधारण, पाणी अडावा, पाणी जिरवा व नगर विक साचे नियोजनच निसर्गाचा समतोल राखण्यास यशस्वी मूलमंत्र असल्याचे सांगून ग्रामविकास समितीने हाती घेतलेले ग्रामविकासाचे कार्य कौतुकास्पद असल्याचेही डॉ. गुट्टे महाराज यांनी सांगितले.  सिन्नरच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावताना माणसे जोडण्याची किमया साधून सार्वजनिक हिताच्या केलेल्या कामाचे आज संपूर्ण तालुका फळे चाखत असून, झाडे लावणाऱ्या दिघोळे यांना विसरून चालणार नसल्याचे सांगत असताना दिघोळेंचा संपूर्ण जीवनपट सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब केदार यांनी आपल्या भाषणातून मांडला. यावेळी कोंडाजीमामा आव्हाड, लक्ष्मणराव सांगळे, हेमंत धात्रक आदींची भाषणे झाली.  यावेळी ग्रामविकास समितीचे अशोक बोडके, जयराम गिते, अंकुश गिते, सोमनाथ बोडके, संदीप नागरे, रामचंद्र कापसे, नामदेव कापसे, सीताराम बोडके आदींसह  ग्रामस्थ उपस्थित होते. पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गिते यांनी प्रास्ताविक तर रामदास ठोंबरे यांनी सूत्रसंचालन केले.उगवत्या सूर्याला....ज्या सूर्याच्या सावलीचाही आपल्या हितासाठी उपयोग करून घेण्यासाठी नमस्कार करणारे, तोच सूर्य मात्र मावळतीला जात असताना त्याला विसरणारी संस्कृती आज बघायला मिळत आहे. आज झालेल्या माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांच्या जीवनगौरव समारंभास निमंत्रण देऊनही तालुक्यातील एकही राजकीय पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने हा विषय नायगाव खोºयात चर्चेचा बनला आहे.

टॅग्स :Nashikनाशिक