शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

सिन्नर बाजार समितीच्या सभापतिपदी लक्ष्मणराव शेळके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2020 00:52 IST

सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे व पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी चास येथील संजय वामन खैरनार यांची वर्णी लागली.

सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतिपदी आमदार माणिकराव कोकाटे गटाचे व पंचायत समितीचे माजी उपसभापती लक्ष्मणराव शेळके यांची बिनविरोध निवड झाली, तर उपसभापतिपदी चास येथील संजय वामन खैरनार यांची वर्णी लागली.सिन्नर बाजार समितीवर आमदार माणिकराव कोकाटे गटाचे बहुमत आहे. त्यामुळे सभापती व उपसभापती निवड बिनविरोध होण्याचे संकेत होते. त्यानुसार दोन्ही पदांची बिनविरोध निवड पार पडली. बाजार समितीचे सभापती विनायक तांबे व उपसभापती सुधाकर शिंदे यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी यासाठी सभापती व उपसभापतिपदाचा राजीनामा दिला होता. या रिक्त जागांची निवड करण्यासाठी सहायक निबंधक एस. पी. रुद्राक्ष यांच्या अध्यक्षतेखाली व सहायक आर. बी. त्रिभुवन व बाजार समितीचे सचिव विजय विखे यांच्या उपस्थितीत संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. सभापतिपदासाठी लक्ष्मणराव शेळके यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून मावळते सभापती विनायक तांबे, तर विनायक घुमरे यांनी अनुमोदक म्हणून आणि उपसभापतिपदाच्या संजय खैरनार यांच्या अर्जावर सूचक म्हणून मावळते उपासभापती सुधाकर शिंदे यांनी सूचक म्हणून, तर संचालक सुनील घुमरे यांनी अनुमोदक म्हणून स्वाक्षरी केली होती. दोन्ही जागांसाठी प्रत्येकी एकेक उमेदवारी अर्ज आल्याने निवडणूक अधिकारी एस. पी. रुद्राक्ष यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली. निवडणुकीत १८ संचालकांना मतदानाचा अधिकार होता. त्यापैकी माजी सभापती व संचालक अरुण वाघ आणि संचालक दत्तात्रय सानप अनुपस्थित राहिले.  सभापतिपदी शेळके, तर उपसभापतिपदी खैरनार यांची निवड जाहीर झाल्यानंतर कोकाटे समर्थकांनी जल्लोष केला. माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, जिल्हा परिषदेचे माजी बांधकाम सभापती अ‍ॅड. राजेंद्र चव्हाणके यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.  यावेळी संचालक सोमनाथ भिसे, दत्तात्रय शेळके, सविता उगले, सुनीता बोऱ्हाडे, शांताराम कोकाटे, लता रूपवते, जगन्नाथ खैरनार, सुनील चकोर, पंढरीनाथ खैरनार, अनिल सांगळे, विजय सानप यांच्यासह आर. एन. जाधव व समर्थक उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक