शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

घोटीला फास्टॅगची अंमलबजावणी सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 00:56 IST

मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर शनिवारी (दि.१५) मध्यरात्रीपासून फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यामुळे टोल नाका महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच नाशिकमार्गे मुंबईकडे खासगी वाहनाने जाणाऱ्या प्रवाशास हृदयविकाराचा झटका आला. पोलिसांच्या सतर्कतेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सुदैवाने त्या प्रवाशाचा जीव वाचला.

ठळक मुद्देप्रवाशाला हृदयविकाराचा धक्का : पोलिसांची दमछाक

घोटी : मुंबई-नाशिक महामार्गावरील घोटी टोल नाक्यावर शनिवारी (दि.१५) मध्यरात्रीपासून फास्टॅगची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. यामुळे टोल नाका महामार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. त्यातच नाशिकमार्गे मुंबईकडे खासगी वाहनाने जाणाऱ्या प्रवाशास हृदयविकाराचा झटका आला. पोलिसांच्या सतर्कतेने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने सुदैवाने त्या प्रवाशाचा जीव वाचला. यावेळी टोल प्रशासनाची रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध न झाल्याने काही काळासाठी गैरसोय झाली होती. मध्यरात्रीपासून पोलिसांचा खडा पहारा लावण्यात आला होता.टोल नाका व्यवस्थापनाकडून संबंधित प्रवाशास कोणत्याही प्रकारची मदत मिळाली नाही. अधिकच्या वेळेमुळे वाहनचालकांसह प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागला.यावेळी पोलीस अधीक्षक अरुं धती राणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे, घोटी टॅपचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल वालझाडे, उपनिरीक्षक आनंदा माळी यांसह पोलीस कर्मचारी उपस्थित होते. शनिवार, रविवार सलग दोन दिवस शासकीय सुट्टी. त्यात भाविक, पर्यटक वर्दळ असल्याने टोल प्रशासन व वाहनधारकांमध्ये हमरीतुमरी होत होती.देशभर फास्टॅग मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत सर्वच वाहनांनी टोल नाक्यावर फास्टॅगद्वारेच आॅनलाइन टोल भरणे अपेक्षित आहे.त्याची अंमलबजावणी दि. १ डिसेंबरपासून होणार होती, परंतु पूर्वतयारी अभावी आणि संभ्रमामुळे ती पंधरा दिवस पुढे ढकलण्यातआली होती, मात्र (दि.१५) मध्यरात्रीपासून फास्टॅगची अंमलबजावणी सुरू केली.अनेक ठिकाणी महामार्ग खड्ड्यातमुंबई-नाशिक महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून, अनेक ठिकाणी महामार्ग खड्ड्यात गेलेला दिसून येतो. दुरु स्तीचा केवळ दिखावा ठरत आहे. खड्ड्यातून मार्ग काढताना होणाºया अपघातांमध्ये अनेकांना जीव गमवावा लागत आहे. तर अनेक जण जखमी झाले असून, वाहनांचेही पाटर््स तुटत असल्याने वाहनचालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtollplazaटोलनाका