शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2018 17:54 IST

देवळा : तालुक्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्शभूमीवर आगामी काळात जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर उजवा कालवा तसेच रामेश्वरपासून पुढील चणकापूर वाढीव कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल अहेर तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.

ठळक मुद्देचणकापूर : दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर लोकसहभागातून रामेश्वर येथील उपक्रममपंचायत पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांची देवळा येथे शासकीय विश्रामगृहावर बैठक

देवळा : तालुक्यात पडलेल्या दुष्काळाच्या पार्शभूमीवर आगामी काळात जनतेचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी चणकापूर उजवा कालवा तसेच रामेश्वरपासून पुढील चणकापूर वाढीव कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शुभारंभ आमदार डॉ. राहुल अहेर तसेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा अहेर यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार यांनी हया कामासाठी रामेश्वर गावातून २ लाख ५१ हजार रूपये लोकवर्गणी जमा करून देण्याचे आश्वासन दिले. १० डिसेंबर रोजी तालुक्यातील ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच शेतकऱ्यांची देवळा येथे शासकीय विश्रामगृहावर बैठक घेण्यात आली होती. त्यावेळी लोकसहभागातून चणकापूर ते उमराणा येथील परसुल धरणापर्यंत कालव्याची वहन क्षमता वाढविण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला होता. या कामासाठी टाटा ट्रस्ट युवा मित्र मोफत मशिनरी पुरवणार असून लोकसहभागातून इंधन खर्च करण्यात येणार आहे. सद्या असलेली कालव्याची वहन क्षमता दिडपट वाढविण्यासाठी कालव्याची आवश्यक तेथे उंची वाढवणे, गाळ काढणे, स्वच्छता करणे आदी उपाय करण्यात येणार आहे. रामेश्वर ते उमराणा येथील परसुल धरणापर्यंत वाढीव कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामाचा शनिवारी शुभारंभ करण्यात आला आहे. रामेश्वर, सुभाषनगर, वाखारवाडी, वाखारी, खुंटेवाडी, उमराणे, पिंपळगाव (वा), दहिवड, मेशी, आदी लाभक्षेत्रात येणाºया गावातील ग्रामपंचायत, नागरीक व शेतकरी आदी लाभार्थ्यांनी कालव्याची वहन क्षमता वाढविण्याच्या कामात सहभागी होउन सहकार्य करावे असे आवाहन आमदार डॉ. राहुल अहेर यांनी यावेळी केले आहे.यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, रामेश्वरचे उपसरपंच विजय पगार, संभाजी अहेर, बापू देवरे, दत्तु अहेर, माणिक पगार, दुला अहेर, मनु अहेर, हरी पगार, नाना अहेर, सुभाष खैर, रामराव मगर, सुखदेव पगार, राजेंद्र केदारे, चिंतामण पगार, बाबुलाल बागुल, किशोर पगार, रामदास पगार, संदीप पगार, भिका पगार, रामदास पगार, गुलाब पगार, कारभारी पगार, भरत पगार, आदींसह शेतकरी उपस्थित होते.चणकापूर उजव्या कालव्यासाठी शासनाने संपादीत केलेल्या क्षेत्रात असलेल्या अनधिकृत विहीर मालकांना लवकरच नोटीस काढून त्यांच्यावर कारवाई करणार आहोत.- जी. आर. काकुळते (उपविभागीय अधिकारी, पाटबंधारे विभाग)