शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

देवळा तालुक्यात शिवसंपर्क अभियानाचा शुभारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 00:49 IST

देवळा : शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून नाशिक जिल्ह्यात जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्दे देवळा, खर्डा, भऊर, लोहोनेर ऊमराणे आदी गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले.

देवळा : शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबविण्यास सुरुवात झाली असून नाशिक जिल्ह्यात जिल्हा संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसंपर्क अभियान राबविण्यात येत आहे.सदर अभियान १२ ते २४ जुलै दरम्यान राबविले जात आहे. देवळा तालुक्यात ग्रामीणचे जिल्हाप्रमुख सुनिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवार दि. २१ रोजी वाखारी येथे बैठक घेऊन अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर देवळा, खर्डा, भऊर, लोहोनेर ऊमराणे आदी गावांमध्ये हे अभियान राबविण्यात आले.पाटील यांनी अभियानाची माहीती दिली, व हे अभियान राबविण्याचा उद्देश स्पष्ट केला. संपुर्ण महाराष्ट्रात शिवसंपर्क अभियान राबवुन तळागाळातील जनतेपर्यंत पोहचणे व त्यांच्या समस्या सोडवून सरकारच्या योजना नागरींकापर्यंत पोहोचवणे, त्याचबरोबर पक्षसंघटन मजबुत करणे हा उद्देश साध्य झाला पाहीजे असे जिल्हाप्रमुखांनी मनोगत व्यक्त केले. बुथप्रमुख व शाखाप्रमुख यांनी घराघरात जावुन शिवसेनेची ध्येयधोरणे व गोरगरीब जनतेची कामे करून हे अभियान यशस्वी करण्याचे आवाहन केले. शिवसंपर्क अभियानात तालुकाप्रमुख सुनिल पवार, उपजिल्हाप्रमुख देवानंद वाघ, देवळा शहर प्रमुख मनोज आहेर, विश्वनाथ गुंजाळ, तालुका संघटक बापु जाधव, भरत देवरे, वसंत सुर्यवंशी, भास्कर आहिरे, देवा चव्हाण, दहिवडचे सरपंच आदीनाथ ठाकूर, बंडू चव्हाण आदी सहभागी झाले होते. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाPoliticsराजकारण