नाशिक - राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेचा जिल्हास्तरीय उद्घाटन सोहळा निफाड तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, नैताळे येथे जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व बालकाला पल्स पोलिओ डोस पाजवून करण्यात आला.
कोविड -१९ च्या महामारीत आरोग्य विभागाने उल्लेखनीय सेवा दिल्याचे नमूद करीत राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेसह अन्य आरोग्यविषयक योजना राबविण्यातही आरोग्य विभाग आघाडीवर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. पी. डी. गांडाळ, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. दिनेश पाटील, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नवलसिंग चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राची गावित तसेच रुग्णकल्याण समिती सदस्य उपस्थित होते. प्रास्ताविक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर यांनी केले.
(आरफोटो- ३१झेडपी पोलीओ) जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील पल्स पोलिओ मोहिमेचा प्रारंभ करताना जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, समवेत डॉ. पी. डी. गांडाळ, डॉ. कपील आहेर, डॉ. दिनेश पाटील आदी.